काय आहे अमेरिकेत 1 लाख लोकांचा बळी घेणारे फेंटॅनिल? अमेरिका-चीन चिंतेत


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चीन फेंटॅनीलला रोखण्यासाठी मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत फेंटॅनील या औषधामुळे 70 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अलीकडेच जो बायडन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात याबाबत चर्चा झाली. हे थांबवण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत. अमेरिकन आरोग्य संस्था सीडीसीच्या म्हणण्यानुसार, फेंटॅनीलच्या ओव्हरडोजमुळे दररोज सुमारे 150 लोकांचा मृत्यू होत आहे. जुलै 2021 ते जून 2022 दरम्यान यूएसमध्ये 107,000 मृत्यू झाले आहेत.

अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की फेंटॅनील म्हणजे काय, दरवर्षी इतके मृत्यू होत असताना, ते लोकांपर्यंत कसे पोहोचते आणि चीनसाठी तो चर्चेचा विषय का बनला आहे?

फेंटॅनील म्हणजे काय?
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, हा एक प्रकारचा सिंथेटिक ओपिओइड आहे. हे एक विशेष प्रकारचे औषध आहे. जे हेरॉइनपेक्षा 50 पट आणि मॉर्फिनपेक्षा 100 पट अधिक स्ट्राँग आहे. त्याच्या ओव्हरडोजमुळे बेशुद्ध पडणे किंवा मृत्यू होऊ शकतो.

फेंटॅनिलचे दोन प्रकार आहेत. प्रथम, जे औषधांमध्ये वापरले जाते. दुसरे, जे बेकायदेशीरपणे वापरले जाते. डॉक्टर रुग्णांना वेदना, शस्त्रक्रियेनंतर आणि कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत फेंटॅनिल लिहून देतात. गेल्या काही वर्षांत बेकायदेशीररीत्या तयार केलेल्या फेंटॅनीलच्या ओव्हरडोजच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेकायदेशीररीत्या बनवण्याचा ट्रेंड 182 टक्क्यांनी वाढला आहे.

का वाढत आहेत ओव्हरडोज आणि मृत्यूची प्रकरणे?
नशा आणखीनच जाणवावी म्हणून फेंटॅनील हे इतर अनेक औषधांमध्ये मिसळून घेतले जात आहे. एवढेच नाही, तर नशा करणाऱ्या औषधांमध्ये मिसळले की त्याची किंमत कमी होते आणि नशा वाढते. परिणामी, हळूहळू त्याचे व्यसन वाढत जाते आणि मानवी जीवनाला धोकाही वाढतो. त्यामुळे त्याचा वापर छुप्या पद्धतीने वाढत आहे.

त्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. एक विचित्र प्रकारचा आनंद जाणवतो. अशक्त वाटू लागते. काही प्रकरणांमध्ये, उलट्या होऊ शकतात आणि गोंधळ होऊ शकतो.

हे द्रव आणि पावडर दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे, जे इतर औषधांसारखे आहे. नुसते बघून तेच औषध आहे की आणखी काही हे कळणे कठीण आहे. सहसा ते हेरॉईन किंवा कोकेनमध्ये मिसळले जाते. मेथॅम्फेटामाईन मिसळून अनेक वेळा त्याच्या गोळ्या तयार केल्या जातात.

अमेरिकेत परिस्थिती का बिघडली?
यासंबंधीची औषधे अमेरिकेत सहज उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत ते लॅबमध्ये सहज आणि कमी खर्चात बनवले जाऊ लागले आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढले. बाजारात वेगवेगळ्या नावाने त्याची विक्री होऊ लागली. Heiman, Poison, Dance Fever, China White, China Girl, Tango, Cash, Great Bear अशा सांकेतिक नावांनी ते उपलब्ध आहे. अमेरिकेतील तरुणांपर्यंत ते सहज पोहोचले. परिणामी, जुलै 2021 ते जून 2022 दरम्यान यूएसमध्ये 107,000 मृत्यू झाले.

मृत्यू अमेरिकेत झाले तर चीनचे नाव कसे आले?
अशा परिस्थितीत अमेरिकेत फेंटॅनीलमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, मग चीनचे नाव कसे पुढे आले आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ते थांबवण्याचे वक्तव्य का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक, चीन दीर्घकाळापासून फेंटॅनीलचा पुरवठादार आहे. जिथून ते बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहोचते. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्येही हा दावा करण्यात आला आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी अमेरिकेने या प्रकरणी 38 लोकांवर कारवाई केली होती, ज्यामध्ये चीनच्या नेटवर्कचे नाव समोर आले होते. आता चीनने आपली निर्यात थांबवण्याचे सांगितले आहे.

एफडीएने कधी आणि का दिली परवानगी ?
यूएस फूड अँड अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) नुसार, 1998 मध्ये वेदनाशामक औषध म्हणून याला मान्यता देण्यात आली होती. जे कॅन्सर रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी औषध कंपन्यांनी तयार केले होते. हे इंजेक्शन, टॅब्लेट किंवा स्किन पॅचद्वारे रुग्णांना दिले जात होते. सीडीसीच्या मते, वैद्यकीय सल्ल्याशिवाय ते घेणे धोकादायक ठरू शकते कारण त्याचा परिणाम 5 मिनिटांत दिसून येतो.