‘शमीला स्वप्नात 7 विकेट घेताना पाहिले’, सेमीफायनलपूर्वीच व्यक्तीने केली होती ‘भविष्यवाणी’


वर्ल्ड कप 2023 च्या उपांत्य फेरीत बुधवारी भारताने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात जवळपास सर्वच खेळाडूंची कामगिरी चांगली असली, तरी चार भारतीय खेळाडूंनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे खेळाडू म्हणजे शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी. यामध्येही मोहम्मद शमी हा सर्वात प्रभावशाली खेळाडू होता, ज्याच्यामुळे संघाने न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव केला. शमीने या सामन्यात एकूण सात विकेट घेतल्या. दरम्यान, सेमीफायनलपूर्वी एका व्यक्तीने केलेले ट्विट खूप चर्चेत आहे, ज्याने शमीच्या 7 विकेट्स घेण्याची आधीच भविष्यवाणी केली होती.

वास्तविक, ट्विटरवर @DonMateo_X14 नावाच्या वापरकर्त्याने 14 नोव्हेंबरला ट्विट केले होते आणि लिहिले होते, ‘एक स्वप्न पाहिले जिथे शमीने सेमीफायनलमध्ये 7 विकेट घेतल्या’. शमीने 7 विकेट्स घेण्याचे स्वप्न पाहिले की नाही, हे आता फक्त त्यालाच माहीत आहे, पण शमीने उपांत्य फेरीत एकूण सात विकेट घेतल्या हे खरे आहे. आता युजरचे हे ट्विट जगभर पसरले आहे. लाखो लोकांनी तो पाहिले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हणतंय, ‘माझे भविष्यही सांगा’, तर कुणी म्हणतंय, ‘फायनलपूर्वी नीट झोप’.

पहा लोकांचे मजेदार ट्विट


विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबाद येथे 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आता लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि यंदाचा विश्वचषक भारतातच जाईल अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.