WC 2023 : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडला विश्वचषकाचा सर्वोत्कृष्ट संघ, त्यात चार भारतीय; कोहलीला बनवले कर्णधार


विश्वचषक स्पर्धेतील लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 10 संघांपैकी केवळ भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. लीग टप्पा संपल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ‘टूर्नामेंटचा संघ’ निवडला. आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्माची निवडलेल्या सर्वोत्तम संघात निवड झालेली नाही. विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 12 खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये भारताचे चार खेळाडू आहेत. विराट कोहलीशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना स्थान मिळाले आहे. कोहलीने 2021 पासून मर्यादित षटकांमध्ये कर्णधारपद भूषवलेले नाही. असे असतानाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्याकडे कमान सोपवली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेला विश्वचषकातील सर्वोत्तम संघ
क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), रचिन रवींद्र (न्यूझीलंड), विराट कोहली (भारत), एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), मार्को जॅन्सन (दक्षिण आफ्रिका), रवींद्र जडेजा (भारत), (दक्षिण आफ्रिका), मोहम्मद शमी (भारत), अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया), जसप्रीत बुमराह (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका).

गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने अंतिम-4 मध्ये स्थान मिळवले आहे. सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. गेल्या वेळी टीम इंडियाला 2019 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा विराट कोहली कर्णधार होता आणि तो सामना महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. धोनी 2020 मध्ये निवृत्त झाला. तो पराभव टीम इंडिया आजवर विसरली नसेल आणि यावेळी मुंबईत किवी संघाकडून त्याचा बदला घेणार आहे.