Tiger 3 Box Office : सलमान खानच्या टायगरची पहिल्याच दिवशी डरकाळी, पण शाहरुखच्या राहिला मागे


सलमान खानचा ‘टायगर 3’ अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. स्पाय थ्रिलर चित्रपट टायगर 3 ने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे प्रचंड नफा कमावला होता. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरनेही प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली होती. टायगर 3 चित्रपटगृहात दाखल झाला आहे, चला जाणून घेऊया सलमानच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कहर केला.

टायगर 3 यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. या स्पाय युनिव्हर्समध्ये अजून बरेच चित्रपट समाविष्ट आहेत, पण सर्वात जास्त क्रेझ टायगर फ्रेंचायझीची आहे. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ यांसारख्या जबरदस्त हिट चित्रपटानंतर सर्वांच्या नजरा टायगर 3 वर लागल्या होत्या.

टायगर 3 ने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली. रिपोर्ट्सनुसार, टायगर 3 ने पहिल्या दिवशी भारतात जवळपास 44.50 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर या चित्रपटाने जगभरात 50 कोटींची कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत सलमानच्या टायगर 3 ने सनी देओलचा सुपरहिट चित्रपट गदरला मागे टाकले आहे. सनी देओलच्या गदरने पहिल्याच दिवशी 40.1 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर टायगर 3 या शर्यतीत खूप पुढे गेला आहे. मात्र यानंतरही सलमान खान शाहरुख खानच्या जवान आणि पठाणच्या ओपनिंग डे रेकॉर्डपेक्षा खूपच मागे राहिला.

टायगर 3 या रविवारी म्हणजेच 12 नोव्हेंबरला रिलीज झाला. या दिवशी दिवाळीसोबतच विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात साखळी सामनाही झाला. हे सर्व असूनही, टायगर 3 ने चांगली कमाई केली. टायगर 3 च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे तर, या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसले. यासोबतच टायगर 3 मध्ये रेवती, आशुतोष राणा, कुमुद मिश्रा आणि रणवीर शौरी देखील दिसले, तर शाहरुख खानचा कॅमिओ देखील खूप लोकप्रिय झाला आहे.

टायगर 3 ची कथा टायगरभोवती फिरते. या चित्रपटात इमरान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात इम्रान टायगरकडून बदला घेताना दिसत आहे. आता हा बदला कशासाठी आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, सलमान खान आणि इम्रान मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत. रिपोर्ट्सनुसार, टायगर 3 चे एकूण बजेट जवळपास 300 कोटी रुपये आहे.