दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी-गणेशजींच्या पूजेसोबत करा कुबेराची पूजा, कधीच भासणार नाही पैशाची कमतरता


दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी-गणेशजींच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-शांती नांदते. तुम्हाला माहिती आहे का, लक्ष्मी आणि गणेश या देवतांची पूजा करण्याशिवाय दिवाळीच्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करणे शुभ आहे?

दिवाळीच्या दिवशी भगवान कुबेर यांचीही पूजा करावी, कारण लक्ष्मी धनाची देवी असताना कुबेर देव यांना धनाची देवता म्हटले जाते, त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेर देव यांचीही पूजा केली जाते.

कशी करावी कुबेर देवाची पूजा?
ज्याप्रमाणे तुम्ही दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करता, तशीच तयारी कुबेर देवासाठीही करावी. कुबेराची मूर्ती लाल रंगाच्या कपड्यावर लक्ष्मी-गणेशाच्या शेजारी ठेवावी. दिवाळीच्या पूजेच्या वेळी कुबेरांच्या समोर तुपाचा दिवा लावा आणि नंतर चंदन, धूप, दिवा आणि फुलांनी पूजा करा. पूजेनंतर भगवान कुबेर मंत्राचा जप करा आणि आरती करा.

कोणत्या दिशेला ठेवावी कुबेराची मूर्ती ?
भगवान कुबेराची पूजा करताना एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्या की त्यांची मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी. या दिशेला कुबेराची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे लक्ष्मी आणि गणेशासोबत कुबेराची पूजा केली जाते.