WhatsApp Tips : एका क्लिकने होऊ शकतो तुमचा खेळ खल्लास, व्हॉट्सअॅपवर एक चूक आणि रिकामे झाले खाते म्हणून समजा


व्हॉट्सअॅप हे जगभरात वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय अॅप आहे, या अॅपवर दररोज करोडो वापरकर्ते सक्रिय असतात. यामुळेच घोटाळेबाज किंवा फसवणूक करणाऱ्यांनी आता लोकांची फसवणूक करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर सुरू केला आहे. तुमची एक छोटीशी चूक तुमचे बँक खाते रिकामी करू शकते.

सिक्युरिटी कंपनी McAfee ने नुकताच ग्लोबल स्कॅम मेसेज स्टडी जारी केला आहे, या रिपोर्टमध्ये McAfee ने स्मार्टफोन युजर्सना सतर्क केले आहे की फसवणूक करणारे WhatsApp वर लोकांची फसवणूक करण्यासाठी कसे काम करतात. शेवटी, ते कोणते संदेश आहेत, ज्याद्वारे लोक अडकले आहेत? ते आम्ही तुम्हाला सांगतो.

मॅकॅफीच्या अहवालात धक्कादायक दावा करण्यात आला आहे, कंपनीचे म्हणणे आहे की, 82 टक्के भारतीय सहजपणे व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या बनावट मेसेजच्या जाळ्यात येतात. इतकेच नाही तर साधारण मेसेज, ईमेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज किमान 12 फेक मेसेज लोकांना पाठवले जातात.

लोकांना फसवण्यासाठी फसवणूक करणारे लोक तुम्हाला बक्षीस मिळाल्याचे मेसेज पाठवतात आणि नंतर बक्षीस पाठवण्याच्या बहाण्याने लोकांकडून वैयक्तिक माहिती वगैरे मागतात. असे मेसेज 99 टक्के खोटे असतात आणि ते फक्त तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे चोरण्यासाठी केले जातात.

दुसरा संदेश, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही कंपनी तुम्हाला WhatsApp वरुन नोकरी देत नाही. उत्तम पगाराचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला अशी कोणतीही खोटी नोकरीची सूचना किंवा ऑफर आढळल्यास, सावध व्हा.

तिसरा मेसेज, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून तुमचा KYC तपशील पूर्ण नसल्याचा मेसेज आला आणि जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून KYC तपशील पूर्ण केले, तर समजून घ्या की कोणीतरी तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करत आहे.

कारण कोणतीही बँक तुम्हाला व्हॉट्सअॅपवर केवायसी पूर्ण करण्यास सांगणारा मेसेज पाठवत नाही किंवा कोणतीही बँक तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की OTP इत्यादी विचारत नाही. आपण यापैकी कोणतीही चूक केल्यास, आपले बँक खाते देखील रिकामे होऊ शकते.