WC : इंग्लंडचा सर्वात स्फोटक फलंदाजाने केले आश्चर्यचकित, एकदिवसीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा


विश्वचषक-2023 मध्ये शनिवारी दोन सामने होणार आहेत. एकीकडे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार आहेत, तर इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघही आमनेसामने येणार आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलकातामध्ये होणार आहे. हा सामना इंग्लंडचा सलामीचा फलंदाज डेव्हिड मलानच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो.

गतविजेता इंग्लंड आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ईडन गार्डन्सवर होणारा सामना हा त्याचा या विश्वचषकातील शेवटचा सामना असेल. यानंतर संघात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलान म्हणाला, संघातील दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू असल्याने मला वाटते की मी विचित्र परिस्थितीत आहे. मला माहित नाही की माझे भविष्य काय असेल आणि ते माझ्या निवडीनुसार किंवा संघाच्या मर्जीनुसार असेल.

इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये आतापर्यंत फक्त मलानलाच चांगली कामगिरी करता आली आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 373 धावा केल्या आहेत. तो म्हणाला, या स्पर्धेनंतर कदाचित मला विचार करायला थोडा वेळ मिळेल. मग मी कुठेही असलो तरी भविष्यात माझ्यासाठी काय आहे ते मी बघेन.

मालन म्हणाला, इंग्लंडसाठी हा माझा शेवटचा सामना असू शकतो आणि तो एका नव्या प्रवासाची सुरुवातही असू शकते. मालनने वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक राहिला. दरम्यान, तो T20 क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाजही ठरला होता.