पीसीबीच्या चुकीमुळे मोईन खानच्या मुलाचे भंगले विश्वचषक खेळण्याचे स्वप्न, समोर आला धक्कादायक खुलासा


पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक मोईन खानने आपल्या देशाच्या क्रिकेट बोर्डाबाबत आश्चर्यकारक खुलासा केला आहे. त्याचा मुलगा आझम खानचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले, त्यामुळे बोर्डाचा निष्काळजीपणा त्याने उघड केला आहे. मोईनने माजी निवडकर्त्यांबाबतही मोठी गोष्ट सांगितली आहे. आझम खान हा त्याच्या वडिलांप्रमाणेच यष्टिरक्षक-फलंदाज आहे. तो पाकिस्तानकडून खेळला आहे, पण त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. आता त्याच्या वडिलांनी सांगितले आहे की, आझमची एकदा अंडर-19 वर्ल्ड कपसाठी निवड झाली होती, पण बोर्डावर बसलेल्या लोकांनी चूक केल्यामुळे तो खेळू शकला नाही.

आझमने पाकिस्तानसाठी आतापर्यंत पाच टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने चार डावात केवळ सात धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तानसाठी 16 जुलै 2021 रोजी नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला. शेवटचा सामना 26 मार्च 2023 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता.

पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनल ए स्पोर्ट्सवर बोलताना मोईन म्हणाला की अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आझमचे नाव आले होते, पण बोर्डावर बसलेल्या लोकांनी चूक केली आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. मोईनने सांगितले की, आझमची जन्मतारीख 10-8-1998 आहे, परंतु बोर्डवर बसलेल्या लोकांनी पासपोर्टवर 8-10-1998 असे समजले आणि त्याचे नाव संघातून काढून टाकले. तो म्हणाला की दोन महिन्यांच्या फरकाने न्यूझीलंडला रवाना होण्याच्या दोन दिवस आधी त्याला संघातून वगळण्यात आले. मोईनने सांगितले की, यानंतर आझम खूप रडला होता आणि त्यानंतर त्याने आझमला समजावून सांगितले की, ही त्याची चूक नाही त्यामुळे त्याने रडू नये.

मोईनने दोन वर्षांपूर्वीची दुसरी घटना सांगितली, जेव्हा बोर्डाने त्याला कोणतेही कारण न देता वर्ल्ड कप संघातून वगळले होते. दोन वर्षांपूर्वी विश्वचषकात आपले नाव आले होते, असे मोईनने सांगितले. तो म्हणाला की तेव्हा रमीझ राजा बोर्डावर आला होता. तो म्हणाला की, त्यावेळी निवडकर्ता मोहम्मद वसीम होता. मात्र कोणतेही कारण न देता त्याला संघातून वगळण्यात आले. मोईन म्हणाला की, चूक झाली असेल, तर ती ओळखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खेळाडू दु:खी होतो, असे तो म्हणाला. यामुळे आझमही दु:खी झाला.