Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला या पाच गोष्टींचे करा दान, जीवनातून दूर होतील आर्थिक समस्या


धनत्रयोदशीचा सण आज म्हणजेच 10 नोव्हेंबरला आहे, या विशेष दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी, आयुर्वेदाचे जनक आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. लोक या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करतात, या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की धनत्रयोदशीच्या दिवशी दान करणे देखील शुभ मानले जाते. तुम्ही अनेक गोष्टी दान करू शकता ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

धनत्रयोदशीच्या दिवशी दान करणे, हे महान दान मानले जाते, असे म्हटले जाते की जर तुमच्या जीवनात आर्थिक समस्या असतील. त्यामुळे या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे दान केल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल.

गरिबांना दान करा धान्य
असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी गरिबांना धान्य दान केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते, जर तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल, तर एखाद्या गरजू व्यक्तीला धान्य दान करा, असे केल्याने देवी लक्ष्मीचीही कृपा होईल. तुम्ही आनंदी रहाला आणि पैशाची-धान्याची कमतरता देखील दूर होईल.

पिवळे वस्त्र करा दान
धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळे वस्त्र दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, असे म्हणतात की पिवळे वस्त्र दान केल्याने पुण्य प्राप्त होते. पिवळ्या रंगाचे कपडे गुरू ग्रहाशी संबंधित आहेत.

मिठाई पण घ्या
धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी मिठाई आणि नारळ दान करा, असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतील, परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही या वस्तू फक्त गरजू व्यक्तीलाच दान कराव्यात.

लोखंडाचे दान
लोखंडाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या जीवनातून अशुभ दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.