मुलीच्या अंगावर उमटत आहेत राम-राम आणि राधे-राधे शब्द, डॉक्टरही आश्चर्यचकित


उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राधे-राधे आणि राम-राम हे शब्द आठ वर्षांच्या मुलीच्या अंगावर आपोआप उमटत आहेत. हे पाहून मुलीचे कुटुंबीयच नाही, तर रुग्णालयातील डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, असे का होते, हे आजपर्यंत कोणालाच समजलेले नाही. काही जण याला चमत्कार म्हणत आहेत, तर काही जण देवाचा आशीर्वाद म्हणत आहेत, मात्र मुलीच्या वडिलांनी सांगितले की तिला पूजा करण्यात खूप रस असल्यामुळेच हे घडत आहे.

हे प्रकरण हरदोईमधील माधोगंज ब्लॉकमधील सहजन गावचे आहे. येथे राहणारे शेतकरी देवेंद्र यांची आठ वर्षांची मुलगी साक्षी हिच्या अंगावर गेल्या 15-20 दिवसांपासून दैवी नावे उमटत आहेत. हिंदी भाषेत उदयास येणारी ही नावे स्पष्टपणे वाचता येतात. हे पाहून कुटुंबीयांनी सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र नंतर मुलीला रुग्णालयात नेले. ते पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. मुलीला पाहिल्यानंतर डॉक्टरही या समस्येवर तोडगा काढू शकले नाहीत, असे कुटुंबीयांनी सांगितले.

वैद्यकशास्त्रात अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी हार मानल्यानंतर या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या मुलीच्या अंगावर अचानक हिंदू देवी-देवतांची नावे दिसू लागल्याने आश्चर्यचकित झालेले शेतकरी देवेंद्र म्हणाले की, हे एक-दोन दिवसांपासून नाही तर 15-20 दिवसांपासून सुरू आहे. अचानक त्यांच्या मुलीच्या हातावर, पायांवर, पोटावर आणि पाठीवर दैवी नावे उमटू लागली आहेत. हे समजल्यानंतर केवळ कुटुंबीयच नाही, तर मुलीचे शाळेतील वर्गमित्र, शिक्षक, गावातील लोक आणि रुग्णालयातील डॉक्टरही हैराण झाले आहेत.

मुलीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी अशी घटना यापूर्वी कधीही पाहिली नव्हती किंवा ऐकली नव्हती. दुसरीकडे, साक्षीचे आजोबा शिव बालक यांनी सांगितले की, त्यांची नात पुजेत सक्रियपणे सहभागी होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब धार्मिक आणि सद्गुणी आहे. मुलीच्या अंगावर असे चमत्कार घडणे, हे दैवी आशीर्वादाचे फलित असण्याची शक्यता आहे. त्यांच्या मुलीला रामजी आणि राधा राणी यांचा आशीर्वाद आहे.