श्रीलंकेच्या स्कोअरपेक्षाही स्वस्त आहेत हे स्मार्ट गॅजेट्स, येथे मिळतील सवलतीच्या दरात


तुम्ही तुमच्या घरासाठी काही छोटे स्मार्ट गॅजेट्स शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. विश्वचषकातील काल झालेल्या सामन्यातील श्रीलंकेच्या स्कोअरपेक्षा स्वस्तात तुम्ही कोणते स्मार्ट गॅझेट खरेदी करू शकता, हे आम्ही तुम्हाला येथे सांगू. या गोष्टी लहान असू शकतात, परंतु त्या तुमची काही कामे सुलभ करतात. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही फक्त 55 रुपयांच्या बजेटमध्ये तुमच्या घरात काय खरेदी करु शकता.

Inventis Plastic LED Light Lamp
या लाईटचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा पर्याय मिळतो. या आधुनिक एलईडी लाईटमध्ये तुम्हाला बहुरंगी पर्याय मिळेल. हे दिवे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. तुम्ही प्रवास करत असाल आणि तुमच्या फोनमधील टॉर्च काम करत नसेल किंवा फोन जवळ नसेल, तर ही लाईट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या लाईटचा आकार इतका लहान आहे की तो तुमच्या छोट्या पिशवीतही सहज बसू शकतो. या लाईटच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर फक्त 29 रुपयांमध्ये मिळत आहे.

Urban king 20 LED Lights
दिवाळी जवळ आली आहे आणि प्रत्येकजण आपापले घर सजवण्यात आणि सजावटीसाठी स्वस्त आणि सुंदर वस्तूंच्या शोधात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत ही लाईट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. ही लाईट सजावटीसाठी एक परिपूर्ण कल्पना सिद्ध होईल. तुम्ही ते कोणत्याही काचेच्या बाटलीत ती लावू शकता. तुम्हाला ही Amazon वर 54 टक्के डिस्काउंटसह फक्त 46 रुपयांमध्ये मिळत आहे.

Adroitz Bike/Bicycle Tyre Led Light
ही टायर लाइट तुमच्या बाईक किंवा सायकलसाठी सुरक्षा गॅझेट देखील सिद्ध होऊ शकते. जर तुम्ही ते तुमच्या दुचाकीच्या टायरला लावले, तर अंधारात गाडी चालवताना समोरच्या लोकांना दुरूनच तुमची बाईक ओळखता येईल. त्यामुळे रस्ते अपघातही टाळता येतील. तुम्हाला ही लाईट Amazon वर 89 टक्के डिस्काउंटसह मिळत आहे. पण तरीही तुम्हाला यासाठी थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला ही लाईट फक्त 66 रुपयांमध्ये मिळत आहे.