SRK Car Collection : आलिशान कारचा ‘जखिरा’, शाहरुखच्या मालकीची सर्वात स्वस्त-महागडी कार कोणती?


जवाननंतर आता शाहरुख खानच्या चाहत्यांच्या नजरा त्याच्या पुढच्या ‘डंकी’ या चित्रपटावर खिळल्या आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपट निर्माते आज शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त डंकीचा टीझर रिलीज करू शकतात. आज शाहरुख खानच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला किंग खानबद्दल खास माहिती देणार आहोत.

कोट्यवधी रुपये मानधन घेणाऱ्या किंग खानकडे कोणत्या गाड्या आहेत किंवा शाहरुखच्या कार कलेक्शनमधील सर्वात स्वस्त आणि महागडी कार कोणती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप
तुम्हाला माहित आहे का की किंग खानकडे रोल्स रॉयस कंपनीच्या एक नाही, तर दोन आलिशान कार आहेत. शाहरुख खानच्या गॅरेजमध्ये पार्क केलेल्या या कारची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये 6.8 लीटर V12 इंजिन आहे, जे 459 hp ची पॉवर आणि 750 Nm टॉर्क जनरेट करते.

रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने ही कार आपल्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट केली होती. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर शाहरुख खानने ही कार खरेदी करण्यासाठी सुमारे 10 कोटी रुपये (ऑन-रोड) खर्च केले आहेत.

सर्वात महाग कार: बुगाटी वेरॉन
ही कार किंग खानच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागडी कार असल्याचे बोलले जाते. अहवालांवर विश्वास ठेवला, तर या कारची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे ही कार फक्त 2.5 सेकंदात 0 ते 100 पर्यंत वेग पकडते आणि या कारचा टॉप स्पीड 400kmph आहे.

सर्वात स्वस्त कार: मर्सिडीज-बेंझ एस-क्लास S350
किंग खान या कारसोबत अनेकदा स्पॉट झाला आहे, जर वृत्तांवर विश्वास ठेवला, तर या कारची किंमत जवळपास 1 कोटी 60 लाख रुपये आहे. 3.0 लिटर 6 सिलेंडर इंजिनसह येत असलेली ही कार 282 hp पॉवर आणि 600 Nm टॉर्क जनरेट करते.

BMW i8
रिपोर्ट्सनुसार, ही एक प्लग-इन हायब्रिड स्पोर्ट्स कार आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरसह 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 560 Nm टॉर्क आणि 355 bhp पॉवर जनरेट करते.