देशातील सर्वात स्वस्त गॅस सिलिंडर मिळत आहे येथे, किंमत फक्त 474 रुपये


निवडणुकीच्या वातावरणात एलपीजी सिलिंडरच्या किमती महिला मतदारांना आकर्षित करण्याचे हत्यार ठरत आहे. वाढत्या महागाईच्या काळात एलपीजीच्या किमती हा सर्वसामान्यांसाठी मोठा निवडणूक मुद्दा बनत आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने एलपीजीवर सबसिडी देण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर आली होती, परंतु एक राज्य असे आहे की जिथे लोकांना 500 रुपयांपेक्षा कमी गॅस सिलिंडर मिळणार आहे.

छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने घोषणा केली आहे, की राज्यातील भूपेश बघेल सरकार गॅस सिलिंडरच्या किमतीतून सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे. काँग्रेस सरकारने जनतेला प्रत्येक सिलिंडरवर 500 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. यानंतर राज्यात एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ 474 रुपये झाली आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. राज्यात एलपीजी सिलिंडरची किंमत 974 रुपये असल्याचे लिहिले आहे. यावर काँग्रेस सरकार 500 रुपये सबसिडी देणार आहे. त्यामुळे राज्यात गॅस सिलिंडर केवळ 474 रुपयांना मिळणार आहे. देशातील सर्वात स्वस्त सिलिंडर छत्तीसगडमध्ये मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


त्यांच्या या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. याआधी काँग्रेसशासित राजस्थानमध्येही राज्य सरकार एलपीजी सिलिंडरवर सबसिडी दिली ​​आहे. तर केंद्र सरकारने गेल्या महिन्यातच LPG सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 400 रुपयांची सूट मिळत आहे.

तत्पूर्वी 1 नोव्हेंबर रोजी देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढ झाली आहे. त्याची किंमत 103.50 रुपयांनी वाढली आहे, त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2000 रुपयांवर पोहोचली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 1833 रुपये, मुंबईत 1785.50 रुपये, कोलकात्यात 1943 रुपये आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपये झाली आहे. कोलकाता वगळता इतर महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 101.50 रुपयांनी महागला आहे.