7000 गाणी, 20 हजार कॉन्सर्ट, दिग्गज संगीतकारावर येणार बायोपिक, धनुष साकारणार प्रमुख भूमिका


प्रसिद्ध अभिनेता धनुष त्याच्या चाहत्यांना प्रभावित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही, मग तो त्याचा लूक असो वा चित्रपट. साऊथ स्टार धनुषची गणना पॅन इंडिया स्टार्सच्या यादीत केली जाते. ‘रांझना’सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या धनुषने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. धनुष एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक उत्कृष्ट दिग्दर्शक देखील आहे.

धनुष हा असा अभिनेता आहे, ज्याने साऊथ सिनेमा ते बॉलीवूडमध्ये क्रॉसओव्हर केले आहे. त्याच्या अभिनयामुळे त्याचे बॉलिवूडमध्येही मोठे नाव आहे. आता धनुष त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा पॅन-इंडिया चित्रपट देण्यास तयार झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनुष या बायोपिकमध्ये इलैयाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2024 मध्ये सुरू होईल आणि 2025 मध्ये रिलीजसाठी सज्ज होईल अशी माहिती आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता धनुषसाठी हा एक मोठा प्रोजेक्ट ठरू शकतो. हा चित्रपट भारतातील एक दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांच्या जीवनावर आधारित असून धनुष मुख्य भूमिका साकारणार आहे.

संपर्क माध्यमांतर्गत हा मोठा प्रकल्प साकारला जाणार आहे. इलैयाराजा यांचा मुलगा युवन शंकर राजा याने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला धनुषला त्याच्या वडिलांच्या बायोपिकमध्ये पाहायला आवडेल. धनुषच्या करिअरमधला हा पहिला बायोपिक असेल ज्यामध्ये तो एवढ्या मोठ्या भूमिकेत दिसणार आहे.

वर्षानुवर्षे संगीतात चमकदार कामगिरी करणाऱ्या इलैयाराजा यांनी 1000 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत आणि 20,000 हून अधिक कॉन्सर्ट सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. इलैयाराजा यांनी 1976 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. तमिळ चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांसाठीही संगीत दिले होते. महान संगीतकार इलैयाराजा यांना 2010 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.

धनुष हा टॉलिवूडमधील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. धनुषचा हा पहिला बायोपिक चित्रपट असेल. मात्र या चित्रपटाबाबत अभिनेता, संगीत दिग्दर्शक आणि निर्मिती कंपनीकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. अलीकडे धनुष तेरे इश्क में, D50 आणि शेखर कममुला या तेलगू चित्रपटात व्यस्त आहे.