मोहम्मद रिझवानने विराट कोहलीसाठी व्यक्त केली ही इच्छा, जिंकली भारतीय चाहत्यांची मने


पाकिस्तानी क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी खास इच्छा व्यक्त केली आहे. ज्यामुळे त्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. विराट कोहलीने केवळ विश्वचषकादरम्यान 49वे आणि 50वे शतक झळकावे, अशी रिझवानची इच्छा आहे. माझ्या हृदयात विराट कोहलीबद्दल खूप प्रेम आहे, असेही रिझवान म्हणाला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, त्याने 49 एकदिवसीय शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, विराट कोहली 48 शतकांसह त्याच्या शतकांची बरोबरी करण्यापासून एक पाऊल दूर आहे आणि जर त्याने आणखी 2 शतके केली, तर तो सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडेल. विराटने या स्पर्धेत आतापर्यंत 1 शतक झळकावले आहे.

अशा परिस्थितीत विराट कोहलीने केवळ विश्वचषकात 49वे आणि 50वे शतक झळकावे, अशी इच्छा मोहम्मद रिझवानने व्यक्त केली आहे, त्याच्या या इच्छेने करोडो भारतीयांची मने जिंकली आहेत. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकांसह एकूण १०० शतके झळकावली आहेत. विराट कोहली 78 शतकांसह जगात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत विराटने वनडेमध्ये 48, कसोटीत 29 आणि टी-20मध्ये 1 शतक झळकावले आहे. विराट कोहलीच्या शतकांशी संबंधित एक घटनाही खूप प्रसिद्ध आहे. खरे तर एकदा एका कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरला विचारण्यात आले होते की, त्याचा 100 शतकांचा विक्रम कोणी मोडू शकेल का? त्यावेळी सचिनने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावे घेतली होती. अशा परिस्थितीत विराट कोहलीसाठी ही मोठी उपलब्धी असेल. त्याचबरोबर मोहम्मद रिझवाननेही विराट कोहलीवरील प्रेम दाखवून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले 6 सामने जिंकले आहेत आणि चमकदार कामगिरी करत आहे. विराट कोहलीही फॉर्मात दिसत आहे. भारताचा पुढचा सामना 2 नोव्हेंबरला मुंबईत श्रीलंकेशी होईल, तर 5 नोव्हेंबरला भारतीय संघ कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. पण न्यूझीलंडविरुद्ध 95 धावा केल्यानंतर तो बाद झाला आणि कारकिर्दीतील 49 वे वनडे शतक केवळ 5 धावांनी झळकावू शकला नाही.