तिसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 12th FAILचा दबदबा कायम, कंगनाच्या तेजसने कमावले फक्त एवढेच


बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या तिच्या नवीन चित्रपट तेजसमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री एअर फोर्स पायलटची भूमिका साकारत आहे. कंगनाचा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच काही विशेष कामगिरी करताना दिसत नाही. यासोबतच विक्रांत मॅसीचा 12th FAIL हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे, जो तेजसपेक्षा चांगला परफॉर्म करत आहे. आता दोन्ही चित्रपटांच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.

Sacnilk च्या सुरुवातीच्या अहवालानुसार, तेजसने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी फक्त 1.25 कोटी रुपये कमावले आहेत, तर 12th FAILने 2.80 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजे विक्रांतच्या चित्रपटाने कंगनाच्या चित्रपटापेक्षा दुप्पट कमाई केली आहे.

तेजसने पहिल्या दिवशी 1.25 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 1.30 कोटी रुपयांची कमाई केली होती. तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनसह या चित्रपटाचा तीन दिवसांत एकूण 3.80 कोटींचा व्यवसाय झाला आहे. 12th FAIL बद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 1.11 कोटींचा व्यवसाय केला. मात्र, दुस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत झेप नोंदवली गेली आणि कलेक्शन 2.51 कोटी रुपये झाले. आता तिसऱ्या दिवशीही आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. विक्रांत मॅसीच्या चित्रपटाने तीन दिवसांत एकूण 6.42 कोटींची कमाई केली आहे.

कगन्ना राणावतच्या चित्रपटात तेजस गिल नावाच्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे, जी भारतीय हवाई दलात आहे. तिला पाकिस्तानातून भारतीय एजंटला सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जर आपण 12th FAILबद्दल बोललो, तर त्याची कथा आयपीएस मनोज शर्मा यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात त्याचा १२वीत नापास होण्यापासून ते अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.