1km गाडी चालवण्याचा खर्च फक्त 2 रुपये! मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट


गाडीची रनिंग कॉस्ट तेव्हाच कमी होऊ शकते, जेव्हा कार तुम्हाला चांगले मायलेज देते आणि तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की CNG कार ग्राहकांना पेट्रोलच्या तुलनेत जास्त मायलेज देतात. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीची किंमतही कमी आहे, मारुती सुझुकीकडे सेलेरियो सीएनजी नावाची चांगली सीएनजी कार आहे.

मारुती सुझुकीच्या या कारवर ऑक्टोबरमध्ये चांगली सूट दिली जात आहे, याचा अर्थ आता ही हॅचबॅक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या दोन्ही हातात लाडू आहेत. एक म्हणजे चांगले मायलेज आणि दुसरे म्हणजे 50 हजार रुपयांपर्यंत चांगली सूट. कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, Celerio चे CNG मॉडेल एक किलो CNG मध्ये 34.43 km/kg मायलेज देते.

मुंबईत सीएनजीचा दर 76.00 रुपये प्रति किलो आहे, म्हणून पाहिले तर सेलेरियोच्या 1 किलोमीटर ड्रायव्हिंगची किंमत सुमारे 2.13 रुपये असेल. या कारचे पेट्रोल प्रकार (LXI MT, VXI MT, ZXI MT) 25.24 किमी, 24.97 किमी (ZXI+ MT) आणि 26.68 किमी (VXI AGS) प्रति लीटर मायलेज देतात.

मारुतीच्या या सीएनजी कारच्या खरेदीवर ग्राहकाला 35 हजार रुपयांपर्यंतची ऑफर, 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळत आहे. या सणासुदीच्या मोसमात तुम्हाला ही सीएनजी कार खरेदी केल्यास 59 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. जर तुम्हाला मारुती सुझुकीची ही हॅचबॅक खरेदी करायची असेल, तर CNG व्हेरिएंटची किंमत 6 लाख 73 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, पॅसेंजर एअरबॅग, EBD सह ABS, रिअर डिफ्रॉगर, रिअर पार्किंग असिस्ट सेन्सर, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.