Leo Collection Day 1 : पठाणापासून जेलरपर्यंत सर्वांची लिओने केली वाईट अवस्था, मिळाली छप्पर फाड ओपनिंग


थिएटरमध्ये पठाणनंतर जवान आणि जेलर सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. या चित्रपटांमुळे सिनेसृष्टीचे चांगले दिवस परत आले होते. प्रेक्षकांची चित्रपटांची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. काल साऊथचा लिओ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच पठाणचा आगाऊ बुकिंगचा विक्रम मोडला होता. आता थलपथी विजयचा लिओ चित्रपट रिलीज झाल्याने वादळ आले आहे.

या तमिळ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग करून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेतल्यानंतर शाहरुख खानपासून रजनीकांतपर्यंत सर्वांनाच धक्का बसेल. विजयचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत होता. चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, विजयच्या चाहत्यांनी त्याला अजिबात निराश केले नाही. चित्रपट पाहण्यासाठी अभिनेत्याचे चाहते चित्रपटगृहात पोहोचत आहेत.

जर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, मिळालेल्या माहितीनुसार, थलपथी विजयच्या लिओने 68 कोटींची जबरदस्त ओपनिंग केली आहे. जगभरात बोलायचे झाले तर लिओने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. यासह या चित्रपटाने एक विक्रम केला आहे. लिओ आता तामिळ इंडस्ट्रीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

शाहरुख खानने पठाणच्या माध्यमातून धमाकेदार पुनरागमन केले. या चित्रपटाने शाहरुख खानला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट दिला. पठाणने पहिल्याच दिवशी 55 ते 56 कोटींचा व्यवसाय केला. जो स्वतःच एक मोठा आकडा मानला जात होता. पण आता या चित्रपटाचा रेकॉर्ड साऊथच्या लिओने मोडला आहे. लिओने ओपनिंग कलेक्शनच्या बाबतीत शाहरुख खानच्या पठाणला मागे टाकले आहे.