WPL 2024 : गुजरातने 11 खेळाडूंना केले बाहेर, काय आहे मुंबई आणि दिल्लीची अवस्था, जाणून घ्या


सर्व पाच फ्रँचायझींनी महिला प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. लीगच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंना कायम ठेवण्याची विंडो 15 ऑक्टोबर रोजी संपली. पाच फ्रँचायझींनी एकूण 60 खेळाडूंना कायम ठेवले असून त्यात 21 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर 29 खेळाडूंना मोकळे करण्यात आले आहे. सर्व फ्रँचायझींनी खेळाडूंना त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार कायम ठेवले आहे. अशी अनेक मोठी नावे आहेत, जी फ्रँचायझींनी कायम ठेवली नाहीत.

महिला प्रीमियर लीगची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती. पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स या संघांनी सहभाग घेतला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले होते.

मुंबईने सोडली या खेळाडूंची साथ
सध्याच्या विजेत्या मुंबईने चार खेळाडूंची साथ सोडली आहे. या संघाने हीदर ग्रॅहमला सोडले आहे. तिच्याशिवाय धारा गुजर, सोनम यादव, नीलम बिश्त यांची सोडली आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक धावा करून पर्पल कॅप जिंकणाऱ्या हेली मॅथ्यूज आणि उदयोन्मुख खेळाडू यास्तिका भाटिया यांना फ्रँचायझीने कायम ठेवले आहे. कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार हरमनप्रीतचाही समावेश आहे.

कायम ठेवलेले खेळाडू- हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया, नताली सीव्हर, अमेलिया कार, इसाबेल वोंग, शोले ट्रॉयन, पूजा वस्त्राकर, सायका इशाक, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, हुमैरा काझी, प्रियांका बाला.

सोडलेले खेळाडू- हीदर ग्रॅहम, धारा गुजर, सोनम यादव, नीलम बिश्त

दिल्ली कॅपिटल्सची काय आहे स्थिती ?
दिल्लीने आपली कर्णधार मेग लॅनिंगला कायम ठेवले आहे. तिच्या नेतृत्वाखाली संघ गेल्या वर्षी अंतिम सामना खेळला होता. शेफली वर्मालाही संघाने कायम ठेवले आहे. शिखा पांडे, तान्या भाटिया यांनाही फ्रँचायझीने कायम ठेवले आहे.

कायम ठेवलेले खेळाडू: एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासन, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू,

रिलीज झालेल्या खेळाडू: अपर्णा मंडल, जसिया अख्तर, तारा नॉरिस

गुजरातची आहे ही अवस्था
गेल्या वर्षी गुजरातची कामगिरी विशेष नव्हती. संघाने यावेळी कठोर निर्णय घेतले आहेत. फ्रँचायझीने 11 खेळाडूंना सोडले आहे, ज्यात अॅनाबल सदरलँड, सुषमा वर्मा, किम गर्थ, सोफिया डंकले यांसारख्या नावांचा समावेश आहे. मात्र, संघाने अॅशले गार्डनर आणि बेथ मुनीसारख्या खेळाडूंना कायम ठेवले आहे.

कायम ठेवलेले खेळाडू: अॅशले गार्डनर, बेथ मुनी, डिलन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह रान, तनुजा कंवर.

सोडण्यात आलेले खेळाडू: अॅनाबेल सदरलँड, अश्वनी कुमारी, जॉर्जिया वेअरहम, हार्ले गल्ला, किम गॅरेथ, मानसी जोशी, मोनिका पटेल, पारुनिका सिसोदिया, शबिनेनी मेघना, सोफी डंकले, सुषमा वर्मा.

आरसीबीने उचलली कठोर पावले
त्याचवेळी आरसीबीने तीन मोठ्या परदेशी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. संघाने डेन व्हॅन निकर्क, एरिन बर्न्स, मेगन शुट या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना वगळले आहे. अ‍ॅलिसा पेरी, हीदर नाइट आणि कर्णधार स्मृती मानधना यांना संघाने कायम ठेवले आहे.

कायम ठेवलेल्या खेळाडू: आशा शोभना, दिशा कसाटा, अ‍ॅलिसा पेरी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन.

सोडलेले खेळाडू: डेन व्हॅन निकेर्क, एरिन बर्न्स, कोमल जंजाड, मेगन शुट, पानम खेमा, प्रीती बोस, शाना पवार

यूपी वॉरियर्सने 4 खेळाडूंना केले बाहेर
यूपीने एलिस हिलीला कायम ठेवले आहे. तसेच, भारताच्या सर्वोत्तम फिरकीपटू दीप्ती शर्मा, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघाने देविका वैद्यला सोडले आहे.

रिटेन केलेले खेळाडू: एलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, प्रशस्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टन, ताहिला मॅकग्रा.

रिलीज झालेल्या खेळाडू: देविका वैद्य, शबनीम इस्माईल, शिवाली शिंदे, सिमरन शेख