WC 2023: टीम इंडियाच्या वर्ल्ड चॅम्पियन होण्याबाबत पाँटिंगने केली मोठी भविष्यवाणी, संघांमध्ये निर्माण होणार घबराट


टीम इंडियाने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून सुरुवात केली. यानंतर टीम इंडियाने आपल्या पुढच्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर आपले लक्ष केंद्रित केले. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला केवळ 191 धावांत गुंडाळून सात विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवला आणि यासह टीम इंडियाने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 8-0 अपराजित मोहीम राखली.

टीम इंडियाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून प्रत्येकजण अंदाज लावू शकतो की यावेळी टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकू शकते. हा अद्याप स्पर्धेचा प्रारंभिक टप्पा असला तरी, टीम इंडियाला आपल्या उर्वरित सामन्यांमध्येही या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगने टीम इंडियाच्या विश्वचषक जिंकण्याच्या आशेवर मोठी भविष्यवाणी केली आहे.

महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंगचा विश्वास आहे की ‘निवांत’ कर्णधार रोहित शर्मा भारताला त्याच्या भूमीवर दुसरा विश्वचषक मिळवून देऊ शकतो. भारताने सलग तीन नेत्रदीपक विजयांसह आपल्या विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. पाँटिंगने आयसीसीला सांगितले की, तो पूर्णपणे निश्चिंत, निवांत आहे. तो विचलित होत नाही. हे त्याच्या खेळातही दिसून येते. तो एक हुशार फलंदाज आहे आणि तो मैदानावर म्हणा अथवा मैदानाबाहेरही निश्चिंत दिसतो.

रोहित डिसेंबर 2021 मध्ये विराट कोहलीच्या जागी भारताचा कर्णधार झाला. रोहितच्या नेतृत्वाखाली विराट आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकतो, असा विश्वास पाँटिंगला आहे. तो म्हणाला, विराट खूप भावनिक खेळाडू आहे. तो चाहत्यांचे ऐकतो आणि त्यांना प्रतिसादही देतो. त्याच्यासारख्या व्यक्तीसाठी हे काम थोडे अवघड गेले असते. पोंटिंग म्हणाला, रोहितला कोणतीही अडचण येणार नाही. तो हुशार खेळाडू असून कर्णधारही उत्तम आहे.

भारताने शेवटचा विश्वचषक 2011 मध्ये अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून आपल्याच भूमीवर जिंकला होता. स्वत:च्या देशात खेळताना चांगली कामगिरी करण्याचे दडपण असते, पण रोहित ते हाताळण्यास सक्षम असल्याचे पाँटिंगने सांगितले. तो म्हणाला, भारतावर अपेक्षांचा दबाव नसेल, असे म्हणता येणार नाही. हे नक्की होईल पण रोहित त्याला सामोरे जाऊ शकतो. भारताकडे खूप प्रतिभावान संघ आहे. त्याची वेगवान गोलंदाजी, फिरकी, टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, सर्वकाही उत्कृष्ट आहे. त्यांना पराभूत करणे खूप कठीण जाईल.