तुम्हाला घरून उचलून घेऊन जातील पोलीस, गुगलवर या गोष्टी शोधल्या तर जाल तुरुंगात!


आपल्याला काहीही शोधायचे असेल, तर आपण लगेचच गुगलचा वापर करतो. जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे अगदी लहानातही लहान गोष्टी शोधण्यासाठी गुगलची मदत घेतात, तर तुम्हाला थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या जाणून घेतल्यावर तुम्ही पुढच्या वेळी Google Search वापरण्यापूर्वी 100 वेळा विचार कराल.

‘आ बैल मुझे मार’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच, येथे या म्हणीचा अर्थ असा आहे की गुगलवर काहीही सर्च केल्याने तुम्हाला नंतर अडचणी येऊ शकतात. अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला तुरुंगात टाकू शकतात.

जर तुम्ही गुगल सर्चच्या मदतीने इंटरनेटवर बॉम्ब कसा बनवायचा याची पद्धत शोधत असाल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. असे काहीही शोधल्यास तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता आणि तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या साइट्स भारतात ब्लॉक केल्या गेल्या असल्या तरी, गुगल सर्चच्या मदतीने अश्लील मजकूर शोधणेही तुम्हाला अडचणीत आणू शकते. तुमची ही एक छोटीशी चूक तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते.

चित्रपट पायरसी हा गुन्हा आहे, जर तुम्ही गुगल सर्चच्या मदतीने पायरसीशी संबंधित गोष्टी शोधल्या, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. चित्रपट पायरसी भारतात बेकायदेशीर आहे, त्यामुळे Google वर असे काहीही शोधणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. तुम्हाला तुरुंगवास किंवा दंड किंवा तुरुंगवास आणि दंड भरावा लागेल.

वर नमूद केलेल्या या तीनच गोष्टी नाहीत, ज्यांना गुगलवर सर्च करणं महागात पडू शकते, याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही सर्च केल्यास थेट तुरुंगात जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, पुढच्या वेळी Google वापरण्यापूर्वी 100 वेळा विचार करा.