Acidity : गरोदरपणात वारंवार होत आहे अॅसिडिटीची समस्या! या टिप्स ठरतील उपयुक्त


गर्भधारणेचा काळ कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या सुंदर क्षणापेक्षा कमी नसतो. आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी नवीन सुरुवात असते. पण गर्भधारणेचा काळ जेवढा आनंदाचा असतो, काही वेळा तो तितकाच कठीण आणि समस्यांनी भरलेला असतो. बाळाला नऊ महिने पोटात ठेवताना आईला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

गरोदरपणात महिलांना वेदना होत असताना, त्यांना गॅसचा त्रास होणे देखील सामान्य आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढल्याने अधिक गॅस तयार होऊ लागतो. गर्भधारणेदरम्यान अॅसिडिटीचा त्रास काही वेळा असह्य होऊ शकतो. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

पुरेशा प्रमाणात पाणी पिणे
गरोदरपणात अॅसिडिटीची समस्या टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यास सुरुवात करावी. गर्भधारणेच्या अवस्थेत दररोज किमान तीन लिटर पाणी प्यावे असे डॉक्टर सांगतात. याचा फायदा मुलालाही होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गरोदरपणात जास्त गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हळूहळू पाणी प्यावे.

मेथीचे दाणे
गॅसच्या समस्येवर मेथीचे दाणे खूप फायदेशीर ठरतात. हा घरगुती उपाय पुरातन काळापासून वापरला जात आहे. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी प्यायल्यास खूप फायदा होतो.

आले आणि पुदिना चहा
त्याचबरोबर पुदिना आणि आल्याचा चहा प्यायल्यास पचनाच्या समस्येपासून आराम मिळतो. विशेषत: अ‍ॅसिडिटीच्या समस्येवर हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अॅसिडिटीसाठी तणाव हे देखील एक कारण आहे. त्यामुळे गरोदरपणात शक्य तितका कमी ताण घ्या. जर तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी टेन्शन फ्री राहणे खूप गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही