
क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला मिळणार आहे. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. उपांत्यपूर्व फेरीतील सामने जिंकून दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा पराभव केला. त्याचबरोबर पाकिस्तानने हाँगकाँगला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Ind-Pak Match : अॅक्शन, थ्रिलसाठी व्हा सज्ज, पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना!
दोन्ही संघांनी आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकले, तर ते अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेशी होऊ शकतो. त्याचवेळी टीम इंडियाचा सामना मलेशियन संघाशी होणार आहे.
मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 202 धावा केल्या. यशस्वीशिवाय रिंकू सिंगने 15 चेंडूत 37 धावा केल्या. भारतीय फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवत नेपाळला केवळ 202 धावांवर रोखले. 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 179 धावा करता आल्या. टीम इंडियासाठी आवेश खान आणि रवी बिश्नोई हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. आवेशने 4 षटकात 32 धावा देऊन 3 बळी घेतले, तर रवी बिश्नोईने 4 षटकात 24 धावा देऊन 3 बळी घेतले.
पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी हाँगकाँगला हरवून उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांनी 68 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ 18.5 षटकांत सर्वबाद 92 धावांत आटोपला.
भारतीय संघ- ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघ- कासिम अक्रम, उमैर बिन युसूफ, आमिर जमाल, अराफत मिन्हास, अर्शद इक्बाल, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, मिर्झा ताहिर, मोहम्मद हसनैन, मोहम्मद अखलाक, रोहेल नजीर, शाहनवाज दहनी, सुफियान मुकीम, उस्मान कादिर.
