आयफोन चोरीला गेल्यावरही मिळेल परत, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज


जर तुम्ही आयफोन वापरकर्ते असाल, तर तुम्हाला तुमचा फोन हरवण्याची किंवा चोरीची भीती नेहमीच असते. चोरीच्या घटना उघडकीस आल्याने रस्त्यावर फोन घेऊन जाणे टेंशनवाले काम होते. पण तुमचे हेच टेन्शन दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा तीन ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यानंतर तुमचा फोन चोरीला गेला, तरी तुम्हाला परत मिळेल. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये आधी काही सेटिंग्ज कराव्या लागतील. जर तुम्ही हे तीन फीचर चालू केले, तर तुमचा फोन चोरीला जाण्याचे टेन्शन संपेल.

फोन चोरीला जाण्यापूर्वी तुमच्या आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जा, त्यानंतर आयडी आणि पासकोडमध्ये Allow Access when lockedच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर कंट्रोल सेंटर आणि अॅक्सेसरीजची निवड रद्द करा.

आयफोनचे स्थान जाणून घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • यासाठी, प्रथम फोनच्या सेटिंग्ज पर्यायावर जा आणि आपल्या नावावर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर Find My iPhone या पर्यायावर क्लिक करा.
  • Find My iPhone पर्यायावर क्लिक केल्यानंतर Find My Network वर Send Last Location वर क्लिक करा.

या सेटिंग्जनंतर, तुमच्या चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या आयफोनचे लोकेशन तुम्हाला मदत करू शकते. आता तुम्ही विचार करत असाल की चोराने फोन घेताच, तो बंद केला, तर तो कशी काय मदत करेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की कधी ना कधी तो फोन चालू करेल, जेव्हा-जेव्हा फोन चालू होईल, तेव्हा तुम्हाला त्याचे स्थान ट्रॅक करण्यास सक्षम असाल.

आयफोनची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये ई-सिम इंस्टॉल केले जाऊ शकते, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या आयफोनसाठी एक ई-सिम देखील खरेदी करू शकता, त्यानंतर आयफोनमधून सिम काढणे कोणालाही अशक्य होईल.