WhatsApp Support : लक्षात ठेवा ही तारीख, या दिवसापासून तुमच्या फोनवर काम करणार नाही WhatsApp


तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल, तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. WhatsApp तुमच्यासाठी अॅपमध्ये केवळ नवीन वैशिष्ट्ये जोडत नाही, तर वेळोवेळी काही स्मार्टफोनवरील समर्थन देखील बंद करते. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप सपोर्ट लवकरच काही स्मार्टफोनसाठी बंद होणार आहे.

कंपनीच्या अधिकृत साइटवर FAQ विभागात WhatsApp सपोर्टबद्दल माहिती दिली आहे. सपोर्ट केव्हा बंद होणार आहे आणि कोणत्या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद झाल्यानंतर चालणे थांबेल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

व्हॉट्सअॅपने माहिती दिली आहे की सध्या हे अॅप अँड्रॉईड व्हर्जन 4.1 आणि त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करते. जर Appleच्या iPhone बद्दल बोलयाचे झाले, तर WhatsApp iOS 12 आणि त्यावरील सर्व आवृत्त्यांवर कार्य करते.

WhatsApp च्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर 2023 पासून, WhatsApp फक्त Android आवृत्ती 5.0 आणि त्यापुढील आवृत्तीवर चालणाऱ्या डिव्हाइसवर काम करेल.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या पृष्ठावर फक्त Android ऑपरेटिंग सिस्टमची माहिती देण्यात आली आहे, आयफोन मॉडेल्सवरील समर्थन संपणार आहे असा कुठेही उल्लेख नाही.

जर तुम्हाला तुमच्या फोनचे OS व्हर्जन देखील तपासायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधी फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल, त्यानंतर अबाउट फोनवर जावे लागेल. येथे तुम्हाला सॉफ्टवेअर पर्यायावर टॅप करावे लागेल. तुमचा फोन कोणत्या व्हर्जनवर काम करत आहे याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

जर तुमच्या फोनवरही व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार असेल, तर तुम्हाला व्हॉट्सअॅपने निर्दिष्ट केलेल्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणारा नवीन फोन घ्यावा लागेल.