प्रभास स्टारर ‘सालार’ या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, आता नाताळला शाहरुख खानच्या डंकीशी होणार त्याची थेट स्पर्धा


साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील मोठा सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. बाहुबलीपासून प्रभासला खूप मागणी आहे. मात्र त्याचे चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालत नाहीत. आता वृत्तांवर विश्वास ठेवला तर, प्रभासचा चित्रपट सालार हा साऊथ सुपरस्टारला पुन्हा रुळावर आणणारा चित्रपट ठरू शकतो. मात्र पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट शाहरुख खानच्या डंकीला टक्कर देऊ शकतो, असे वृत्त समोर आले आहे.

आता प्रभासच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. प्रशांत नील आणि होम्बल फिल्म्सने जाहीर केले की त्यांचा अॅक्शन-थ्रिलर, प्रभास अभिनीत ‘सालार’ त्याच्या नियोजित रिलीज तारखेला म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी रिलीज होणार नाही. दरम्यान, तरण आदर्शने या चित्रपटाबाबत नवीनतम अपडेट दिले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरणने प्रभासचा ‘सालार’ कधी रिलीज होणार, हे सांगितले आहे. तरणच्या म्हणण्यानुसार, सालार 2023 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची थेट स्पर्धा शाहरुख खानच्या वर्षातील तिसरा मोठा चित्रपट ‘डंकी’शी होणार आहे.

मात्र, ही माहिती अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केलेली नाही. मात्र निर्माते शुक्रवारी याबाबत अधिकृत घोषणाही करतील असे मानले जात आहे. सध्या देशभरातील अनेकांना सालारच्या वितरकांकडून एक मेल आला आहे, ज्यामध्ये हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शाहरुखचा डंकी या दिवशी रिलीजसाठी आधीच सज्ज आहे.


व्हीएफएक्स शॉर्ट्समधील समस्येमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता व्हीएफएक्स शॉट्स पूर्ण झाल्यानंतरच ‘सालार’ची नवीन रिलीज डेट जाहीर केली जाईल. रिपोर्ट्सनुसार, ‘सालार’ची टीम अजूनही जवळपास 600 VFX शॉट्स मिळवू शकलेली नाही. चित्रपटाचे व्हीएफएक्स आउटपुट अद्याप आलेले नाही त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजला उशीर होत आहे.

या री-शूटचे कारण म्हणजे प्रेक्षकांना उत्तम सिनेमाचा अनुभव देणे. वास्तविक, प्रशांत नीलला त्याच्या आधीच्या प्रोजेक्टपेक्षा या चित्रपटात चांगले काम करायचे आहे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्याने अलीकडेच एका बैठकीत हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्याला असे वाटले की अजून सुधारण्यासाठी खूप वाव आहे. पण चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटबाबत समोर येत असलेली माहिती फारशी आनंददायी म्हणता येणार नाही. सध्याच्या काळात शाहरुख खानशी स्पर्धा करणे कोणालाही महागात पडू शकते. अशा परिस्थितीत प्रभास बॉलीवूडच्या बादशहासोबत खरोखरच पंगा घेणार का, हे पाहणे बाकी आहे.