केवळ पाय दाखवून दरमहा पाच लाख रुपये कमावते ही मॉडेल


जर तुम्हाला वस्तू कशी विकायची, हे माहित असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही काहीही विकू शकता. या जगात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या वस्तू विकून लाखो रुपये कमावतात. या अशा गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना आश्चर्य वाटते. या मालिकेत आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जी फक्त तिच्या पायाचा फोटो शेअर करून महिन्याला लाखो रुपये कमवते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आम्ही ज्या महिलेबद्दल बोलत आहोत, ती तिच्या पायाचे फोटो विकून दरमहा पाच लाखांहून अधिक रुपये कमावते आहे.

येथे आपण लंडनस्थित सिनी एरियलबद्दल बोलत आहोत, जी व्यवसायाने मॉडेल आणि टॅटू आर्टिस्ट आहे, परंतु तिच्या कमाईचा मुख्य स्त्रोत तिचे पाय आहेत. यामुळे ती दर महिन्याला 5,000 पौंड (5 लाखांपेक्षा जास्त) कमवते आणि या पैशातून ती तिचे सर्व छंद पूर्ण करते आणि जगातील विविध देशांना भेटी देते आणि आता विलासी जीवन जगत आहे.


41 वर्षीय सिनी सांगतात की, लोकांना तिच्या पायाची फक्त तीनच छायाचित्रे पाहायला आवडतात. एका पायाचे तळवे दाखवून दुसऱ्या पायाने जमिनीवर पडलेल्या वस्तू उचलणे आणि तिसरा पाय पुढे खेचणे. ही छायाचित्रे पाहण्यासाठी लोक लाखो रुपये देतात. डेली स्टारशी बोलताना तिने सांगितले की ती वेबसाइटवर तिचे फोटो पोस्ट करते आणि नंतर त्याबद्दल वर्णन लिहिते. यानंतर ती त्या चित्रांची किंमत ठरवते.

ती सांगते की अशा फोटोंमुळे कधी-कधी तिची कमाई सात लाखांच्या वर जाते.सध्या ती विलासी जीवन जगत आहे आणि तिच्या करिअरबद्दल ती म्हणाली की आता ती वेबसाइट उघडणार आहे. जिथे ती तिची छायाचित्रे विकून जास्त पैसे कमवणार आहे.