समोर आला रणबीर कपूरच्या अॅनिमलमधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, या दिवशी रिलीज होणार टीझर


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट निर्माते एकापाठोपाठ एक स्टारकास्टचे फर्स्ट लूक पोस्टर जारी करत आहेत. आधी निर्मात्यांनी अनिल कपूरचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे आणि आता चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस रश्मिका मंदान्ना हिनेही फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. निर्मात्यांसोबत रश्मिकाने स्वतःही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्टर शेअर केले आहे.

पोस्टरमधील रश्मिकाचा साधेपणा चाहत्यांची मने जिंकत आहे. साडी आणि मंगळसूत्र घातलेली रश्मिका डोळे खाली करून दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरही हलके हसू आहे. हे पोस्टर शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, तुझी गीतांजली. म्हणजेच चित्रपटातील रश्मिकाच्या पात्राचे नाव गीतांजली असणार आहे. रश्मिका मंदान्ना ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे.


तरण आदर्शनेही रश्मिकाचे पोस्टर शेअर केले आहे. 28 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता अॅनिमलचा टीझर प्रदर्शित होणार असल्याची माहितीही त्यांनी शेअर केली आहे. कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. निर्मात्यांनी याआधी अनिल कपूरचा बलबीर सिंगच्या भूमिकेतील फर्स्ट लुक पोस्टर चाहत्यांसह शेअर केला होता. ज्यामध्ये अनिलही शानदार दिसत होता.

आम्ही तुम्हांला सांगतो, याआधी ‘अ‍ॅनिमल’ सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार होता. पण जवानच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी अॅनिमलची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निर्मात्यांचा हा निर्णयही अगदी योग्य मानला जात आहे. आता हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.