गदर 2 ने शाहरुखच्या पठाणची जिरवली, सनी देओलच्या नावावर सर्वात मोठा विक्रम


सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 या चित्रपटाने सहा आठवड्यात इतिहास रचला आहे. गदर 2 हा आतापर्यंत हिंदीत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाच्या नावावर होता. आता सनी देओलने हळूहळू पण निश्चितपणे ते स्थान मिळवले आहे, जे प्रत्येक स्टारचे स्वप्न असते.

शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण हा चित्रपट यावर्षी जानेवारी महिन्यात मोठ्या पडद्यावर आला. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसचा इतिहासच बदलून टाकला. याने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आणि कमाईच्या बाबतीत हिंदीत पहिल्या क्रमांकावर आली. मात्र, आता शाहरुखचा रेकॉर्ड सनी देओलने मोडला आहे.

पठाणच्या हिंदी व्हर्जनने 50 दिवसांत 521.95 कोटींचा व्यवसाय केला. मात्र, तमिळ आणि तेलुगूसह भारतात या चित्रपटाने 540.51 कोटींचा व्यवसाय केला. तर गदर 2 फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने 6 आठवड्यात एकूण 522 कोटींची कमाई करून पठाणला मागे टाकले.

गदर 2 ची कमाई

  • पहिला आठवडा: 284.63 कोटी
  • दुसरा आठवडा: 134.47 कोटी
  • तिसरा आठवडा : 63.35 कोटी
  • चौथा आठवडा: 27.55 कोटी
  • पाचवा आठवडा : 7.28 कोटी
  • सहावा आठवडा : 4.72 कोटी
  • एकूण कमाई: 522 कोटी रुपये

पठाणच्या हिंदी व्हर्जनच्या कमाईवर नजर टाकली, तर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 351 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 91.5 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 45.65 कोटी रुपये, चौथ्या आठवड्यात 13.95 कोटी रुपये, पाचव्या आठवड्यात 8.45 रुपये, सहाव्या आठवड्यात 8.85 कोटी आणि सातव्या आठवड्यात 2.55 कोटींचा व्यवसाय केला.

गदर 2 चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. 2001 मध्ये आलेल्या ‘गदर’ या सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. पठाणबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. हा एक अॅक्शनपॅक्ड चित्रपट होता, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.