35 वर्षांचा पाकिस्तानी मुलगा पडला 70 वर्षांच्या कॅनेडियन आजीच्या प्रेमात, लग्न देखील केले


प्रेमात पडायला वय नसते असे म्हणतात. कधी आणि कोणाकडे कोण आकर्षित होईल, काही सांगता येत नाही. असेच काहीसे एका 35 वर्षीय पाकिस्तानी मुलासोबत घडले, जो एका ७० वर्षीय कॅनेडियन महिलेच्या प्रेमात इतका पडला की दोघांनी लग्न केले. आता या अनोख्या प्रेमकथेची सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात चर्चा होत आहे. याबाबत नेटिझन्स विविध गोष्टींबद्दल बोलत आहेत.

डेली पाकिस्तानच्या वृत्तानुसार, नईम शहजाद असे या तरुणाचे नाव आहे. वयातील अंतरामुळे लोक त्याला केवळ टोमणे मारत नाहीत, तर नईमने केवळ पैशासाठी एका वृद्ध महिलेची जोडीदार म्हणून निवड केल्याचा आरोपही करत आहेत. काही लोक त्याला ‘गोल्ड डिगर’ म्हणत त्यांची खिल्ली उडवत आहेत. दरम्यान, नईमची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने मेरीला कसे भेटलो आणि दोघेही प्रेमात पडले हे सांगितले.

नईमने सांगितले की, सुरुवातीला दोघेही चांगले मित्र होते. पण हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 2012 मध्ये त्याची फेसबुकवर मेरीशी भेट झाली. त्यानंतर नईमच्या जवळच्या लोकांनीही वयातील अंतराबद्दल चिंता व्यक्त केली, पण तो कॅनेडियन महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता. नईमच्या म्हणण्यानुसार, मेरीने त्याला फेसबुकवर भेटल्यानंतर केवळ तीन वर्षांनी त्याला प्रपोज केले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी लग्न केले.

व्हिसा न मिळाल्यामुळे नईम मेरीसोबत कॅनडामध्ये राहू शकला नाही. पण आता मेरीला पाकिस्तानचा व्हिसा मिळाला आहे. ती नुकतीच पाकिस्तानात आली आहे आणि सहा महिने येथे राहण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, मेरी तिच्या पेन्शनवर जगते. पतीलाही ती वेळोवेळी आर्थिक पाठबळ देत आहे. यामुळे लोक नईमला गोल्ड डिगर म्हणत टीका करत आहेत.