World Alzheimer day : जर तुम्ही विसरायला लागलात गोष्टी, तर तुम्ही या मानसिक आजाराचे झाले आहात शिकार, अशा प्रकारे तुम्ही करू शकता स्वतःचे संरक्षण


तुम्हालाही गोष्टी विसरण्याची समस्या भेडसावत असाल आणि ही समस्या खूप दिवसांपासून कायम आहे, तर आताच लक्ष द्या. हे अल्झायमर रोगाचे लक्षण आहे. जगभरात 35.6 दशलक्षाहून अधिक लोक अल्झायमर रोगाने ग्रस्त आहेत. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिन साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार 2030 पर्यंत अल्झायमरच्या रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते. या आजारामुळे व्यक्ती गोष्टी विसरायला लागते. पूर्वी ही समस्या वयाच्या 50 नंतर होत होती, पण आता 30 ते 40 वयातच लोक याला बळी पडत आहेत. अल्झायमरमुळे स्मरणशक्ती आणि विचारांशी संबंधित समस्या उद्भवतात. सुरुवातीला या आजाराची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत, पण जसजसा हा आजार वाढत जातो, तसतसे मेंदूला हानी पोहोचू लागते. काही प्रकरणांमध्ये, व्यक्तीची स्मरणशक्ती खूपच कमकुवत होते. या आजारावर आजपर्यंत कोणताही इलाज नाही.

बऱ्याच प्रकरणांमध्ये, रुग्णांना या रोगाचे निदान होत नाही. स्मरणशक्तीची समस्या असली, तरी लोक वाढत्या वयाची समस्या समजतात आणि डॉक्टरांकडून तपासणी करून घेत नाहीत. अशा परिस्थितीत हा आजार शरीरात फोफावतो आणि नंतर तो गंभीर होतो. वाढत्या वयानुसार, हा आजार धोकादायक बनतो आणि काही प्रकरणांमध्ये व्यक्ती सर्वकाही विसरण्यास सुरवात करते. अशा परिस्थितीत तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कामासाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो.

याबाबत न्यूरोसर्जन सांगतात की अल्झायमर रोग मेंदूच्या पेशींभोवती प्रथिनांच्या असामान्य निर्मितीमुळे होतो. अमायलोइड प्रथिनांच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे, मेंदूच्या पेशींभोवती प्लेक्स तयार होतात. प्रथिने अशा प्रकारे कार्य करण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही, परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये हे सर्व घडले, तर त्याला अल्झायमर रोग होतो.

सर्जन सांगतात की लोकांना अल्झायमरबद्दल माहिती नाही. लोक याला मानसिक आजार किंवा वेडेपणा मानतात, परंतु तसे नाही. या कारणास्तव हा रोग सुरुवातीला ओळखला जात नाही. अशा स्थितीत लोकांना अल्झायमरच्या लक्षणांची माहिती असणे गरजेचे आहे.

या लक्षणांची घ्या काळजी

  • अनेकदा गोष्टी विसरणे
  • बोलण्यात अडचण
  • चालणे किंवा संतुलन राखण्यात अडचण
  • लोकांपासून दूर रहाणे
  • कोणत्याही कामात रस नसणे

एकदा अल्झायमरचा आजार झाला की त्यावर इलाज नसतो, मात्र दैनंदिन जीवनात काही खबरदारी घेतल्यास या आजाराचा धोका कमी करता येतो, असे सर्जन सांगतात. त्यासाठी पुरेशी झोप घेणे, मानसिक ताणतणाव न घेणे, आहाराची काळजी घेणे आणि दररोज व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.