लहान मुले देखील चालवू शकतात ही इलेक्ट्रिक कार, ड्रायव्हिंग लायसन्सची नाही आवश्यकता


फियाटने एक अनोखी कार लॉन्च केली आहे, जे पूर्ण इलेक्ट्रिक मोडमध्ये चालते. ही इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च होणाऱ्या MG कॉमेट EV पेक्षा लहान आहे. Fiat Topolino नावाची ही इलेक्ट्रिक कार फक्त 2.53 मीटर लांब आहे. तर एमजी कॉमेट ईव्हीची लांबी 2.97 मीटर आहे. Fiat Topolino ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. चांगली गोष्ट म्हणजे ही कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही. म्हणजेच 14 वर्षांची मुले देखील ती चालवू शकतात, कारण ही कार हेवी क्वाड्रिसायकल सेगमेंटमध्ये ठेवण्यात आली आहे.

फियाटच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 5.5 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ते 75 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळेल. तसेच या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड 45 किलोमीटर प्रति तास आहे.

ही टोपोलिनो कार विटा ग्रीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यात रेट्रो स्टाइल व्हील्स, रुफ टॉपमध्ये रिट्रॅक्टेबल कॅनव्हास आणि कोलाज्ड ग्लासचा पर्याय आहे. कार डोअर आणि डोअरलेस व्हर्जनमध्ये खरेदी केली जाऊ शकते. यासोबतच तुम्हाला यूएसबी फॅन, स्पीकर यांसारख्या इतर अनेक अॅक्सेसरीज मिळतील.

तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की एकीकडे टोयोटा 800 किलोमीटरची कार लॉन्च करत आहे, मग एवढी कमी रेंज आणि स्पीड असलेली कार का खरेदी करायची? वास्तविक, कंपनीने हे वाहन शाळा आणि कोचिंगला जाणाऱ्या मुलांना लक्षात ठेवून लॉन्च केली आहे. यामुळे अल्पवयीन वाहन चालवण्याच्या घटना कमी होतील आणि पेट्रोलवरील खर्चातही बचत होईल.

फियाट टोपोलिनोची किंमतही बरीच कमी ठेवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला फक्त 7,544 युरो (सुमारे 6.70 लाख रुपये) मध्ये मिळेल. जर तुम्हाला ते हप्त्यांवर खरेदी करायची असेल, तर तुम्ही ते 48 महिन्यांच्या हप्त्यांवर खरेदी करू शकता, जिथे तुम्हाला दरमहा केवळ €39 म्हणजेच 3500 रुपये द्यावे लागतील.

फियाटने ही कार नुकतेच इटलीमध्ये लॉन्च केले आहे. मात्र, या वर्षाच्या अखेरीस ती जर्मनी आणि फ्रान्समध्येही लॉन्च केली जाईल. सध्या भारतात तिच्या आगमनाबाबत कोणतीही माहिती नाही.