Heart disease : रोज एवढी दारू प्यायल्यास होईल हृदयविकारापासून बचाव, वाढणार नाही कोलेस्ट्रॉलही


जे लोक कधीतरी दारु पितात, त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे त्यांच्या आरोग्यास फायदा होतो. बऱ्याच लोकांना दारु पिण्यासाठी आणि जवळजवळ दररोज सेवन करण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. काही लोक जास्त पितात आणि काही कमी पितात, परंतु तुम्हाला माहित आहे का की मर्यादेत मद्यपान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आजपासूनच दारू पिण्यास सुरुवात करावी. ही माहिती फक्त त्या लोकांसाठी आहे, जे रोज दारू पितात. दैनंदिन दारू पिणाऱ्यांनी ठराविक मर्यादेत दारू प्यायल्यास त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय खराब कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते. मात्र, प्रत्येक व्यक्तीसोबत हे घडतेच असे नाही.

याबाबत तज्ज्ञ सांगतात की महिलांसाठी दररोज एक पेग आणि पुरुषांसाठी दोन पेग घेणे खूप फायदेशीर आहे. जर या प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केले, तर ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तथापि, याचा अर्थ असा नाही की जे लोक दारूचे सेवन करत नाहीत, त्यांनी ते सुरू करावे. तसेच रोज एवढी दारू प्यावी लागते असे नाही. अल्कोहोलच्या बाबतीत, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रतिक्रिया आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतो.

अल्कोहोलशी संबंधित जोखीम आणि फायद्यांमध्ये व्यक्तीचा आहार, व्यायाम आणि धूम्रपानाच्या सवयी हे देखील मोठे घटक आहेत. म्हणजेच रोज व्यायाम करणारी, चांगली जीवनशैली आणि उत्तम खाण्याच्या सवयी असणारी, धूम्रपान न करणारी व्यक्ती जर मर्यादित प्रमाणात मद्यपान करत असेल, तर त्याच्या शरीरावर सामान्य माणसाइतका गंभीर परिणाम होत नाही.

जास्त प्रमाणात अल्कोहोल पिणे खूप धोकादायक असू शकते. त्यामुळे बीपी वाढते आणि हृदयाचे ठोकेही अनियमित होतात. पक्षाघाताचा धोकाही असतो. अल्कोहोल यकृताला हानी पोहोचवते आणि पाचक रोग आणि यकृत सिरोसिसचा धोका असतो.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगला आहार, व्यायाम आणि तंबाखूचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना आधीच हृदयविकार आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारे मद्यपान टाळावे. या प्रकरणात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील महत्त्वाचे आहे. दररोज जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो आणि मानसिक आरोग्य देखील बिघडते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही