उद्यापासून 3 दिवस बँकांमध्ये होणार नाही कामकाज, हे आहे कारण


जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल, तर उद्यापासून तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वास्तविक, उद्यापासून विविध राज्यांमध्ये 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. गणेश चतुर्थीमुळे अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्या असतात. अशा परिस्थितीत बँकिंगशी संबंधित कोणतेही काम होणार नाही. याशिवाय आज म्हणजेच 17 सप्टेंबर रविवार असल्याने देशभरातील बँका बंद आहेत. वास्तविक, गणेश चतुर्थीची सुट्टी 19 सप्टेंबरला असते. तरीही, तुमच्या शहरात बँकेला सुट्टी कधी आहे, हे जाणून घ्यायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. देशातील अनेक भागात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. RBI नुसार बँका केव्हा आणि कुठे बंद राहतील ते आम्ही तुम्हाला सांगतो.

RBI च्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, तेलंगणा येथे 18 सप्टेंबर रोजी विनायक चतुर्थीनिमित्त बँका बंद राहतील. तर 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँकांना सुट्टी असेल. भुवनेश्वर आणि पणजीमध्ये 20 सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नुआखाईमुळे बँका बंद राहतील. अशाप्रकारे भुवनेश्वर आणि पणजीमध्ये 19 आणि 20 सप्टेंबर रोजी बँका बंद राहतील.

आणखी आठ दिवस बंद राहणार आहेत बँका

  • 20 सप्टेंबर 2023 कोची आणि भुवनेश्वरमध्ये गणेश चतुर्थी आणि नुआखाईमुळे बँका बंद राहतील.
  • श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त 22 सप्टेंबर 2023 रोजी कोची, पणजी आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.
  • 23 सप्टेंबर 2023 रोजी चौथ्या शनिवारी देशभरात बँका बंद राहतील.
  • रविवार, 24 सप्टेंबर 2023 रोजी बँका बंद राहतील.
  • 25 सप्टेंबर 2023 रोजी श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंतीनिमित्त गुवाहाटीमधील बँकांना सुट्टी असेल.
  • मिलाद-ए-शरीफनिमित्त जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममधील बँका २७ सप्टेंबर २०२३ रोजी बंद राहतील.
  • 28 सप्टेंबर 2023 ईद-ए-मिलादमुळे अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इम्फाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँका बंद राहतील.
  • 29 सप्टेंबर 2023 ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

जर तुमच्याकडे चलनाबाहेर गेलेली 2000 रुपयांची नोट असेल, तर ती लवकरात लवकर बदलून घ्या. आरबीआयने या नोटा बदलण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 ठेवली आहे. त्याचबरोबर गणेश चतुर्थी आणि इतर कारणांमुळे देशाच्या विविध भागात बँकांना सुट्ट्या आहेत, अशा स्थितीत नोटा बदलून न घेतल्यास अडचणींना सामोरे जावे लागू शकते.