पेरूमध्ये सापडलेल्या एलियनच्या मृतदेहाची माहिती खोटी! असे का म्हणत आहेत शास्त्रज्ञ ?


अलीकडे एलियन्सच्या अस्तित्वाविषयी जेवढी चर्चा झाली, तेवढी क्वचितच झाली असेल. या चर्चेचा मुद्दा आहे कथित एलियन्सचे मृतदेह. वास्तविक, नुकतेच मेक्सिकन संसदेत दोन गूढ मृतदेह दाखवण्यात आले आणि ते मृतदेह एलियनचे असल्याचा दावा करण्यात आला. ‘एलियन’चे मृतदेह कोणीतरी दाखवण्याची ही जगात पहिलीच वेळ आहे. कार्बन डेटिंगने हे मृतदेह हजारो वर्षे जुने असल्याचे दाखविल्याचा दावाही करण्यात आला आहे. आता काही लोक या गोष्टींवर विश्वास ठेवू शकतात, परंतु काही शास्त्रज्ञांना हे सत्य पचवता आले नाही की ते मृतदेह खरोखरच एलियनचे आहेत.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, यूएस नेव्हीचे निवृत्त पायलट रायन ग्रेव्हज यांनी जेमी मावसन यांनी केलेले सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. स्वत:ला UFO तज्ज्ञ म्हणवणाऱ्या जेमीने दावा केला होता की, एलियन्सचे हे मृतदेह अगदी खरे आहेत आणि त्यांची कार्बन डेटिंगही झाली आहे, पण जेमीचे हे दावे केवळ एक प्रसिद्धी स्टंट असल्याचे रायनचे म्हणणे आहे, त्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे. कथित एलियनचे मृतदेह खरे नसून ते तयार करण्यात आले असल्याचा दावा केला जात आहे. हे मृतदेह बाहुल्यांसारखे दिसत असले तरी ते खरे वाटावेत असा प्रयत्न करण्यात आला.

वृत्तानुसार, मेक्सिकन संसदेत दाखविण्यात आलेल्या कथित मानवेतर मृतदेहांबाबत अनेक दावे करण्यात आले होते. त्यांच्या हाताला मानवाप्रमाणे पाच नव्हे तर फक्त तीन बोटे असल्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय त्यांचे डोकेही खूप लांब होते आणि डोळे मोठे होते.

पेरूमधील एका खाणीतून हे एलियन्सचे मृतदेह सापडल्याचा दावाही करण्यात आला असून कार्बन डेटिंगच्या माध्यमातून हे मृतदेह 700 आणि 1800 वर्षे जुने असल्याचे शोधण्यात यश आले आहे. मात्र, आता रायन ग्रेव्हजने हे दावे खोटे ठरवून नवा वाद सुरू केला आहे.