Dengue cases : तुमच्या फ्रीजच्या ट्रेमध्येही आहे डेंग्यूचा डास, ६ महिने राहू शकतो जिवंत


आता देशातील अनेक राज्ये डेंग्यूला बळी पडत आहेत. पश्चिम बंगालपासून तामिळनाडूपर्यंत डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. काही राज्यांमध्ये या तापामुळे रुग्णांचा मृत्यूही होत आहे. मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच या तापाची लागण होत आहे. डेंग्यूमुळे रुग्णालयांमध्येही रुग्णांची गर्दी वाढत आहे. अनेक प्रकरणांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची पातळीही कमी होत आहे. यामुळे रुग्णाला रक्ताची गरज असते. सततच्या पावसामुळे या तापाचा धोका आणखी वाढला आहे. अशा परिस्थितीत डेंग्यूपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. डेंग्यूच्या डासांची पैदास कोठे होते, त्याची लक्षणे काय आहेत आणि ते कसे टाळावे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी साधला.

तज्ज्ञ सांगतात की, डेंग्यू हा एक प्रकारचा विषाणू संसर्ग आहे. एडिस डास चावल्यामुळे होतो. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा सूर्य बाहेर येतो आणि तापमान वाढू लागते, तेव्हा डेंग्यूचा डास सक्रिय होतो. या डास चावल्यानंतर खूप ताप, स्नायू दुखणे, अंगावर पुरळ येणे आणि उलट्या आणि जुलाब देखील होऊ शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, हा ताप स्वतःच बरा होतो, परंतु काही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसतात आणि प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. जे जीवघेणे ठरते.

त्याचबरोबर तज्ज्ञ असे देखील स्पष्ट करतात की, डेंग्यूच्या डासांची पैदास फक्त स्वच्छ पाण्यातच होते. डेंग्यूच्या डासांना प्रजननासाठी अत्यल्प पाणी लागते. घरी ठेवलेल्या रेफ्रिजरेटरच्या ट्रेमध्येही तो वाढतो. रेफ्रिजरेटरच्या ट्रेमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळून येतात. लोकांना असे वाटते की जवळपास कुठेही साचलेले पाणी नाही, पण तरीही त्यांना डेंग्यू का झाला? याचे कारण लोक रेफ्रिजरेटरच्या ट्रेमधील पाणी स्वच्छ करत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना आठवड्यातून किमान दोनदा ट्रे स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय घराच्या छतावर ठेवलेले कुलर आणि भांडी नियमित स्वच्छ करा.

डेंग्यूची अंडी फ्रिजमध्ये सहा महिने सक्रिय राहतात, असे तज्ज्ञ सांगतात. या काळात अंडी स्वच्छ पाण्याच्या संपर्कात आल्यास त्यातून डास जन्म घेऊ शकतात. अशा परिस्थितीत घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण डेंग्यू हा धोकादायक आजार आहे. यामुळे रक्तस्त्राव होतो, जो रुग्णासाठी घातक ठरू शकतो. या आजारामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते.

कसे करावे डेंग्यूपासून स्वतःचे संरक्षण

  • मच्छरदाणी वापरा
  • पाण्याची टाकी झाकून ठेवा
  • लांब बाह्यांचे कपडे घाला
  • नालेही स्वच्छ करा
  • तुम्हाला ताप असल्यास डेंग्यूची तपासणी करा

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही