तिरुपती बालाजी नव्हे, तर हे आहे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर! उत्पन्न जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल


संपूर्ण भारतामध्ये लाखो मंदिरे आहेत, जिथे भक्त नेहमी जमतात. जर आपण ओडिशाची राजधानी भुवनेश्वरबद्दल बोललो, तर येथे 500 हून अधिक मंदिरे आहेत. हे भारताचे मंदिर शहर म्हणूनही ओळखले जाते. भारतातील या सर्व मंदिरांमध्ये भाविक जातात आणि नवस करतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करतात. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांबद्दल सांगणार आहोत.

पद्मनाभस्वामी मंदिर: हे मंदिर दक्षिण भारताच्या केरळ राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम येथे आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिराची एकूण संपत्ती 1,20,000 कोटी रुपये आहे.

तिरुपती बालाजी: आंध्र प्रदेशात स्थित भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे मंदिर तिरुपती बालाजी देखील जगभरात प्रसिद्ध आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत मंदिरांमध्ये याची गणना होते. या मंदिरात सुमारे 9 टन सोने आणि 14 हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

शिर्डी साईबाबा: शिर्डी साई मंदिर हे देखील धार्मिक श्रद्धेचे केंद्र आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मंदिराची वार्षिक कमाई 1800 कोटी रुपये आहे.

सिद्धिविनायक मंदिर : मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची गणना देशातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये केली जाते. दरवर्षी लाखो लोक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराची वार्षिक कमाई 125 कोटी रुपये आहे.