वारंवार रिचार्ज करण्यामुळे हैराण झाला आहात का तुम्ही? हे रिचार्ज प्लॅन करतील तुमची सुटका, खर्च करावे लागतील एवढे पैसे


जर तुम्ही वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासाला कंटाळले असाल, तर हे रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी आहेत. आज आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करावे लागणार नाही. या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण वर्षाची वैधता मिळेल. यामध्ये तुम्हाला मोफत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, अमर्यादित डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

येथे आम्ही तुम्हाला Airtel, Jio आणि Vodafone च्या एका वर्षाच्या वैधतेच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. हा प्लॅन घेतल्यानंतर वर्षभर रिचार्ज करण्याच्या त्रासातून तुमची सुटका होईल.

एअरटेलचा 3359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळतो, यामध्ये तुम्हाला दररोज 100 SMS देखील मिळतात. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा वापरण्याची संधी मिळते. 365 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar, Wynk Music इत्यादींचा आनंदही मिळतो.

जिओचा 2,999 रुपयांचा प्लॅन
Jio चा हा प्लान Airtel पेक्षा थोडा स्वस्त आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण वर्षभर दररोज 2.5GB डेटाचा लाभ मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमाचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला वर्षभर मोफत मनोरंजन मिळेल.

वोडाफोनचा 3099 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांच्या वैधतेसह अनेक फायदे मिळत आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMA आणि 2 GB डेटा मिळतो. त्याच वेळी, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

या प्लॅन्स व्यतिरिक्त, Airtel, Jio आणि Vodafone चे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, जे तुम्हाला एक वर्षाची वैधता देतात आणि ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित फायदे मिळतात.