सोमवार हा शिवपूजेसाठी का मानला जातो सर्वोत्तम दिवस, काय आहे चंद्र देवाशी संबंध?


भगवान शिवांना देवांचा देव महादेव म्हणतात, ज्यांना प्रसन्न करणे खूपच सोपे. शिवशंभूंचा आशीर्वाद प्रत्येक व्यक्तीला मिळावा असे वाटते. भोलेनाथाची पूजा केल्याने जे तुमच्या नशिबात नाही तेही प्राप्त होते, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान भोलेनाथला समर्पित आहे. असे मानले जाते की सोमवारी व्रत आणि पूजा केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण याचे कारण काय? सोमवारी असे काय विशेष आहे की हा दिवस शिवशंभूच्या पूजेला समर्पित आहे.

सोमवार म्हणजेच भोलेनाथाच्या पूजेचा दिवस या दिवशी महादेवाची आराधना केल्याने देव खूप प्रसन्न होतो आणि भक्तांची झोळी आनंदाने भरतो. आठवड्याच्या सात दिवसांमध्ये सोमवार हा फक्त भगवान शिवाच्या उपासनेसाठी का समर्पित आहे? त्याचे अर्धे रहस्य या दिवसाच्या नावातच दडलेले आहे. सोमवारमधील सोम म्हणजे चंद्र, जो स्वतः भगवान शिवाच्या जटांमध्ये असतो. सोमचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले जातात.

सोमवार नावात आणखी एक अतिशय महत्त्वाचे रहस्य दडलेले आहे. जेव्हा आपण सोमवारचा उच्चार करतो, तेव्हा त्यात ओम देखील येतो. सोमवारमध्ये ओम देखील समाविष्ट आहे आणि शिव शंभू हे स्वतः ओंकार आहेत, त्यामुळे हा दिवस अधिक महत्वाचा ठरतो.

यामागे सनातन धर्माची पौराणिक कथाही आहे. कथेनुसार या दिवशी चंद्रदेवाने महादेवाची पूजा केली होती आणि महादेवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवांना क्षयरोगापासून मुक्त केले होते. या कारणास्तव, सोमवार भोलेनाथाच्या पूजेसाठी समर्पित आहे. दुसऱ्या एका कथेत असे सांगितले आहे की, माता पार्वतीने भोलेनाथला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि 16 सोमवार उपवास देखील केला होता. यावर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून या दिवशी व्रत पाळण्याची खूप श्रद्धा आहे.

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करा. यानंतर चंदनाचा लेप लावून बेलपत्र, फुले, धतुरा अर्पण करून अन्नदान करावे. यानंतर भोलेनाथासमोर दिवा लावून शिव चालीसा आणि शिव स्तुती पाठ करा. भगवान शिवासोबत माता पार्वतीची पूजा करा आणि पार्वती चालिसाचा पाठ करा. शेवटी भगवान शंकराची आरती करावी.