जर तुम्ही Airtel, Jio आणि Vodafone वापरकर्ते असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी, दूरसंचार कंपन्या त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये OTT चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहेत. या बाबतीत Airtel, Jio आणि Vodafone एकमेकांपेक्षा कमी नाहीत. या तीन कंपन्यांच्या कोणत्या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळत आहेत आणि कोणत्या प्लानमध्ये तुम्हाला कमी किमतीत जास्त फायदे मिळतील, हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
Airtel, Jio, Vodafone च्या सर्व प्लॅनमध्ये आता मिळवा OTT चे मोफत सबस्क्रिप्शन, तुम्हाला खर्च करावे लागतील एवढे पैसे
जिओ 749 प्लॅन : जिओ सिनेमा
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि अमर्याद डेटाचा आनंद मिळत आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची संधी आहे आणि दररोज 2GB डेटा वापरण्याचा फायदा आहे. इतकेच नाही तर या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळत आहे, ज्यामध्ये तुम्ही Jio सिनेमा आणि Jio TV च्या मोफत सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकता.
जिओ 1099 प्लॅन : Netflix मोफत
84 दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 168GB डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा वापरण्याची सुविधा मिळते. अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS सोबत, या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio कडून Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
व्होडाफोन 369 प्लॅन : SonyLiv
Vodafone च्या या प्लान मध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा आणि 100 SMS मिळत आहेत. याशिवाय 30 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये Sony Liv चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. एवढेच नाही, तर या प्लॅनमध्ये तुम्ही अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचाही आनंद घेऊ शकता.
एअरटेल प्लॅनमध्ये प्राइम मेंबरशिप मोफत
या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह Amazon Prime चे मोफत सदस्यत्व मिळत आहे. अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस मिळत आहेत. याशिवाय तुम्ही दररोज 2.5GB डेटाचा आनंद घेऊ शकता.