Jawan Online: डाउनलोड करायचा आहे शाहरुखचा जवान? त्याआधी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी


चित्रपटगृहात न जाता शाहरुख खानचा जवान चित्रपट पाहायचा आहे का? इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स आहेत, जिथे तुम्हाला जवान आणि इतर नवीनतम चित्रपटांच्या पायरेटेड कॉपी मिळतील. परंतु ही पद्धत अनधिकृत आहे. जर तुम्ही अनाधिकृत प्लॅटफॉर्मवरून जवान डाउनलोड करत असाल तर असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

कोणत्याही अनधिकृत वेबसाइटवरून चित्रपट डाउनलोड करण्याची आणि पाहण्याची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. यासोबतच तुमच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरून जवान डाउनलोड करायचे असल्यास, आधी खाली नमूद केलेल्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

कोणत्याही अनधिकृत प्लॅटफॉर्मवरून चित्रपट डाउनलोड करणे भारतात बेकायदेशीर मानले जाते. जवाना डाऊनलोड करता येईल अशा वेबसाइट्स सापडल्या तरीही हे काम टाळावे. अन्यथा तुमच्यावर पायरसीचा दावा दाखल केला जाऊ शकतो (कॉपीराइट कायदा 1957). भारतात अनेक पायरसी वेबसाइट्सवर बंदी घालण्यात आली आहे.

पायरसी चित्रपट असलेल्या वेबसाइट्समध्ये व्हायरस, मालवेअर यासारख्या धोकादायक गोष्टी असतात. जर ते तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरपर्यंत पोहोचले, तर तुमच्या वैयक्तिक तपशीलापासून बँक खात्यापर्यंत सर्व काही धोक्यात येऊ शकते.

नियमांकडे दुर्लक्ष करून तुम्ही शाहरुख खानचा जवान बेकायदेशीर वेबसाइटवरून डाउनलोड केल्यास तुम्हाला कठोर शिक्षा होऊ शकते. सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 च्या सुधारित विधेयकानुसार, जर एखाद्या व्यक्तीने चित्रपटाची पायरसी केली, तर त्याला 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 10 लाखांचा दंड भरावा लागू शकतो.

जर तुम्ही घराबाहेर पडण्याच्या मनःस्थितीत नसाल तर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर जवान येण्याची वाट पाहावी लागेल. आजकाल कोणताही चित्रपट थिएटरमधून काढून टाकल्यानंतर 2-3 महिन्यांत OTT वर येतो.

तुम्हाला चित्रपट पाहण्यात रस असेल किंवा तुम्ही शाहरुखचे चाहते असाल तर चित्रपटगृहात जाऊन जवानचा आनंद घेणे हाच उत्तम पर्याय आहे, कारण चित्रपटगृहात जी मजा येते, ती घरात अनुभवता येणार नाही. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही निष्काळजीपणे जवान ऑनलाइन डाउनलोड केले, तर तुम्हाला व्हिडिओच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागेल. आता शाहरुखच्या कोणत्या चाहत्याला त्याचा चित्रपट खराब दर्जाचा पाहायचा असेल?