देशात मधुमेहाचा आजार साथीच्या रोगाप्रमाणे पसरत आहे. हा आजार आता लहान मुलांनाही आपली शिकार करत आहे. चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली यामुळे मधुमेहाची व्याप्ती दरवर्षी वाढत आहे. मधुमेहामुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. या एकाच आजारामुळे इतर अनेक आजार होतात. जेव्हा शरीरात इन्सुलिन तयार होणे थांबते किंवा ते आवश्यकतेनुसार तयार होऊ शकत नाही, तेव्हा साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. ज्यामुळे मधुमेह होतो. या आजारावर कोणताही इलाज नाही. यावरच नियंत्रण ठेवता येते. बहुसंख्य लोकांना मधुमेहाची लक्षणे माहीत नसणे, ही चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत हा आजार शरीरात वाढत राहतो आणि हळूहळू गंभीर स्वरूप धारण करतो.
Diabetes : लघवी केल्याने कळेल तुम्हाला मधुमेह आहे की नाही, ही आहेत 4 लक्षणे
अशा परिस्थितीत त्याची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे. तुमच्या लघवीच्या काही लक्षणांवरून तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे देखील कळू शकते.
याबाबत तज्ज्ञ सांगतात की, जर शरीरातील साखरेची पातळी दीर्घकाळ जास्त राहिली तर त्यामुळे मधुमेह होऊ शकतो. तुम्ही तुमच्या लघवीद्वारे मधुमेहाची काही लक्षणे देखील शोधू शकता. मधुमेह झाल्यास लघवीमध्ये ही चार लक्षणे दिसू शकतात.
जर तुम्ही जास्त पाणी पीत नसाल. तरीही वारंवार लघवी होणे, हे मधुमेहाचे लक्षण आहे. काही लोकांना रात्री अनेक वेळा लघवी करण्याची सवय असते. हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
जर तुम्हाला लघवी करताना लघवीला वास येत असेल आणि असे दररोज होत असेल, तर हे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचे लक्षण आहे असे समजून घ्या. अशा परिस्थितीत, आपण ताबडतोब स्वतःची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम, यासाठी तुम्ही तुमच्या साखरेची पातळी तपासली पाहिजे.
जर तुम्हाला मधुमेह असेल, तर त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. यामुळे तुमच्या शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढते, त्यामुळे लघवीचा रंग बदलू लागतो. जर लघवीचा रंग हलका तपकिरी असेल आणि ही समस्या आठवडाभर राहिली, तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
लघवी करताना जास्त फेस येत असेल, तर शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षण आहे, जो किडनीवर मधुमेहाचा परिणाम दर्शवू शकतो, जरी प्रत्येक बाबतीत फेस येणे हे मधुमेहाचे लक्षण नाही, पण नंतर एकदा तपासले पाहिजे.
अशा प्रकारे करा स्वतःचे रक्षण
- आपल्या आहाराची काळजी घ्या
- दररोज व्यायाम करा
- मानसिक ताण घेऊ नका
- तुमची साखरेची पातळी तपासत राहा
- रात्री उशिरा झोपू नका
- तुमचे वजन नियंत्रणात ठेवा