जगातील असे गाणे ज्याने आतापर्यंत घेतले 12 जणांचे प्राण, जे गुनगुनतात त्यांची होते हत्या!


गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही? असे मानले जाते की संगीत ऐकल्याने व्यक्तीचा मूड चांगला होतो, तणावाची समस्या दूर होते. याशिवाय संगीत ऐकण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु गाणे एखाद्याचा जीव घेऊ शकते, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? होय, फिलीपिन्समधील एक गाणे आहे, जे जगातील सर्वात धोकादायक गाणे मानले जाते. जो कोणी हे गाणे गातो, त्याची हत्या होते, असा दावा केला जातो. आतापर्यंत हे गाणे गाणाऱ्या 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे जगातील सर्वात धोकादायक गाणे अमेरिकन गायक फ्रँक सिनात्रा यांनी गायले आहे, परंतु त्याचे गाणे इतके धोकादायक असू शकते की एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, असे त्याला वाटले नसेल. हे गाणे ‘माय वे’ आहे, ज्याला फिलिपाइन्सचे ‘किलिंग सॉन्ग’ असेही म्हटले जाते. एखाद्या गायकाने हे गाणे थेट स्टेजवर गाण्याचा प्रयत्न केल्यास त्याची हत्या होते, असा दावा केला जातो. या गाण्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

इतके खून होऊनही या गाण्यावर फिलीपिन्समध्ये बंदी घालण्यात आली नसली तरी त्याची भीती इतकी आहे की लोक ते गाण्यास घाबरतात. फिलीपिन्समध्ये अनेक कराओके बार आहेत, जिथे या घातक गाण्यावर बंदी आहे. असे म्हणतात की 90 च्या दशकात हे गाणे गाताना किंवा नंतर गायकांची हत्या व्हायची.

वृत्तानुसार, एका पॉडकास्टरने सांगितले की, हे गाणे गाण्यामुळे झालेल्या हत्येचे खरे कारण म्हणजे ते लोकांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त करते. गायक ज्या बारमध्ये हे गाणे म्हणायचे, त्या बारमध्ये शस्त्रधारी लोक येत असत आणि ते दारूच्या नशेत असत. अशा स्थितीत दारूची नशा आणि गाण्याचे बोल त्यांना खुनासाठी प्रवृत्त करायचे.