च्या मारी ! येथे ऑनलाईन विकला जात आहे आइन्स्टाईनचा मेंदू, 20 हजार लोकांनी घेतला विकत


सध्या घरबसल्या ऑनलाइन शॉपिंगचे युग आहे. एका क्लिकवर कोणतेही उत्पादन तुमच्या घरी पोहोचते. पण तुम्ही कधी मेंदू ऑनलाइन ऑर्डर केला आहे का? आता तुम्ही म्हणाल हा काय विनोद आहे. पण एक ऑनलाइन शॉपिंग पोर्टल अशाच प्रकारच्या उत्पादनाची विक्री करत आहे, ज्याने लोकांच्या मनाचा थरकाप उडवला आहे. हा मेंदू अशा कोणत्याही साधारण व्यक्तीचा नसून जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचा असल्याचा दावा पोर्टलने केला आहे. गंमत म्हणजे 20 हजारांहून अधिक लोकांनी तो आधीच विकत घेतला आहे.

आता हा कुठे मिळतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक, चीनमध्ये ताओबाओ नावाची एक ई-कॉमर्स कंपनी आहे, जी लोकांना आइनस्टाईनचा मेंदु सांगून अनोखी उत्पादने विकत आहे. ही चिप किंवा औषध नाही तर आभासी मेंदू आहे. कंपनीचा दावा आहे की, याचा वापर करून लोकांचा मेंदु आइनस्टाईनप्रमाणे धावू लागेल.

कंपनीने आपल्या जाहिरातीत लिहिले आहे की, हे एक आभासी उत्पादन आहे. याचा वापर करून तुम्ही आणखी हुशार व्हाल. एका रात्रीच्या झोपेनंतर, तुमचा मेंदू आईन्स्टाईनसारखा विकसित झालेला असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की Taobao हे छोटे शॉपिंग पोर्टल नाही. हे पोर्टल 2021 मध्ये जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर होते.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, या उत्पादनाची किंमत 0.1 ते एक युआन म्हणजेच 11.35 रुपये आहे. हे उत्पादन इंटरनेटवर खूप लोकप्रिय आहे. ते परवडणारे असल्याने अनेकजण ते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

अहवालानुसार, आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांनी ते विकत घेतले आहे. त्यांच्यापैकी अनेकांना असे वाटते की त्यांचा मेंदु पूर्वीपेक्षा थोडे वेगाने काम करत आहे. एका वापरकर्त्याचे म्हणणे आहे की ते खूप प्रभावी आहे. दुसरीकडे, दुसरा वापरकर्ता म्हणतो, हे उत्पादन तुम्हाला मानसिक आराम देण्यासोबत आत्मविश्वास पातळी वाढवते. त्याच वेळी, काही लोक असेही म्हणत आहेत की ते आधीच मूर्ख होते आणि त्यांनी हे उत्पादन खरेदी करून ते सिद्ध केले आहे.