होळी असो, दिवाळी असो की ईद, प्रत्येक सणाचे सेलिब्रेशन बॉलिवूड स्टार्समध्ये पाहायला मिळते. स्टार्स केवळ असे खास दिवसच साजरे करत नाहीत, तर या सणांचे सेलिब्रेशनही त्यांच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. आज कृष्ण जन्माष्टमी आहे, जी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्त साजरी केली जाते. लोक दहीहंडी फोडून हा खास दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
Janmashtami : गोविंदा आला रे… या बॉलिवूड गाण्यांनी जन्माष्टमीला बनवा आणखी खास
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये कृष्ण जन्माष्टमीची उत्कंठा पाहायला मिळते. याशिवाय अशी अनेक गाणी रचली गेली आहेत, जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी फोडताना त्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. चला तुम्हाला अशाच काही गाण्यांबद्दल सांगतो, ज्याद्वारे तुम्ही या खास दिवसात रंगत जाल.
गो गो गोविंदा
चला गो गो गोविंदाने सुरुवात करूया. कृष्ण जन्माष्टमीवर आधारित गाण्यांमध्ये हे खूप लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे 2012 मध्ये आलेल्या ओएमजी चित्रपटात होते, जे मिका सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले होते.
चांदी की डाल पर सोने का मोर
या यादीतील पुढचे गाणे सलमान खानच्या हॅलो ब्रदर्स या चित्रपटातील आहे. चांदी की डाल पर सोने का मोर असे या गाण्याचे शीर्षक आहे. हे गाणे रिलीज होऊन 24 वर्षे झाली, असली तरी अजूनही लोकांना त्याचे व्यसन लागले आहे.
गोविंदा आला रे
पुढचे गाणे आहे गोविंदा आला रे, हे गाणे जरी जुने असले तरी देखील ते आजही तेवढ्याच उत्साहाने वाजवले जाते. 1963 मध्ये रिलीज झालेल्या शम्मी कपूर यांच्या ब्लफमास्टर चित्रपटातील हे गाणे आहे. दहीहंडीवर आधारित हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. आजही त्याचा आस्वाद घेता येतो.
मच गया शोर सारी नगरी में
1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या खुद्दार या चित्रपटातील ‘मच गया शोर सारी नगरी’ या गाण्यानेही कृष्ण जन्माष्टमीला खूप धूम केली होती.
शोर मचा गया शोर
1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या बदला या चित्रपटातील शोर मचा गया शोर हे गाणे देखील त्याकाळी खुप गाजले होते आणि आज देखील ते तेवढेच लोकप्रिय आहे.