हरियाणातील चरखी-दादरी येथून एका मजुराच्या खात्यात 200 कोटी रुपये जमा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूण मजुराने सांगितले की त्याला इतके पैसे कसे मिळाले याची कल्पना देखील नाही. मजूर तरुणाचे कुटुंब अत्यंत घाबरले असून, सरकारने हे पैसे ठेवावेत आणि त्यांना वाट्टेल ते करावे, त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारायचा नाही नये, असे त्यांचे म्हणणे आहे.
मजुराच्या खात्यात आले 200 कोटी, संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित, कुठून आला एवढा पैसा ?
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील बेरला येथील आहे. येथे राहणारा मजूर विक्रम आणि त्याचा चुलत भाऊ प्रदीप यांनी गावकऱ्यांसमोर दावा केला आहे की, विक्रमच्या बँक खात्यात 200 कोटी रुपये आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी विक्रमच्या घरी जाऊन चौकशी केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. विक्रमची आई बीना देवी यांनी सांगितले की, ही रक्कम त्यांच्या मुलाच्या येस बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, ही रक्कम त्याच्या खात्यात का आली, याबाबत कुटुंबीयांना माहिती नाही.
या संपूर्ण प्रकरणामध्ये विक्रमला मोठी फसवणूक झाल्याचा संशय आहे, त्याने या प्रकरणाची माहिती ट्विट करून पीएम, सीएम, डीजीपी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ऑनलाइन एफआयआर दाखल करून दिली आहे. सध्या जिल्हा पोलीस या संपूर्ण प्रकरणी काहीही बोलण्याचे टाळत आहेत. आपल्या बँकेत व्यवहार करणाऱ्या व्यक्तीने व्यवहारासाठी 9 नंबरचा वापर केल्याचे सांगितले जात आहे.
बेरला येथील रहिवासी असलेला विक्रम मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. दोन महिन्यांपूर्वी तो पतौडी येथे नोकरीसाठी गेला होता. येथे तो एक्सप्रेस 20 नावाच्या कंपनीत मजूर म्हणून काम करत होता. खाते उघडण्याच्या नावाखाली कंपनीने त्याच्याकडून कागदपत्रे घेतली आणि नंतर खाते बंद करण्यास सांगून कामावरून काढून टाकले. विक्रमने या कंपनीत केवळ 17 दिवस काम केले होते.