IND vs PAK : नसीम शाह खेळपट्टीवर शुबमन गिलशी भिडला, रागाच्या भरात केले असे कृत्य


आशिया चषक 2023 चा हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात कॅंडी येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव सुरू होऊन काही वेळ झाला नाही तोच पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहने मर्यादा ओलांडली. मैदानावर तो शुभमन गिलशी भिडला. पावसामुळे 4.2 षटकांनंतर सामना थांबवण्यात आला, मात्र त्याआधी गिलने नसीमच्या 7 चेंडूंचा सामना केला होता. 1.4 षटकात गिलने नसीमच्या पहिल्या चेंडूचा सामना केला आणि या चेंडूवर गिल बाद होण्यापासून बचावला.

यानंतर चौथ्या षटकात नसीम आक्रमणावर आला. त्याच्यासमोर गिल स्ट्राईकवर होता. या षटकात नसीमने अप्रतिम गोलंदाजी केली. गिलला त्याच्या षटकात हातही खोलता आला नाही. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी नसीम धाव घेत होता, पण शेवटच्या हालचालीवर गिल क्रीजच्या बाहेर गेला. जे पाकिस्तानी गोलंदाजाला आवडले नाही आणि तो गिलकडे गेला आणि त्याच्याशी वाद घालताना दिसला. नसीमने चौथ्या षटकात फक्त एक धाव दिली. या षटकात त्याने वाईड बॉल टाकला.

पावसामुळे 4.2 षटकात खेळ थांबेपर्यंत गिलने 8 चेंडूंचा सामना केला होता, पण त्याला खातेही उघडता आले नव्हते. दुसरीकडे, भारतीय कर्णधार रोहित शर्माने 16 चेंडूत 11 धावा केल्या. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला, तेव्हा शाहीन शाह आफ्रिदीने पाचव्या षटकात फक्त 2 चेंडू टाकले होते. मुसळधार पावसामुळे खेळाडूंना मैदान सोडावे लागले.

पावसानंतर खेळ सुरू झाला तेव्हा भारतासाठी चांगली बातमी नव्हती.शाहीनने भारतीय चाहत्यांची मने तोडली. त्याने आपल्या षटकातील शेवटचा चेंडू रोहितला टाकला आणि तो आऊट झाला. पावसानंतरचा भारतासाठी हा मोठा धक्का होता. आफ्रिदीने विकेट मेडन ओव्हर टाकली.