Google Map : Google Maps वर सेव्ह केला आहे का तुमचा वैयक्तिक डेटा? अशा प्रकारे काही मिनिटांत हटवा


आजच्या युगात डेटा प्रायव्हसी ही कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच वेळी, डेटा चोरीचा धोका आजही सर्वाधिक आहे. आजकाल आपण कुठेही जातो, तेव्हा बहुतेक लोक गुगल मॅप वापरतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या प्लॅटफॉर्मवर संवेदनशील (महत्त्वाची) माहिती देखील उपलब्ध आहे, जसे की आपल्या घराचा पत्ता, लायसन्स प्लेट इ.

मात्र, आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण गुगल मॅपमध्ये तुम्हाला तुमची संवेदनशील माहिती अस्पष्ट करण्याचा पर्याय मिळतो. खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा वैयक्तिक डेटा ब्लर करू शकता.

  • स्टेप 1: Google Map अॅप किंवा वेबसाइट उघडा.
  • स्टेप 2: तुमच्या घराचा पत्ता शोधा किंवा नकाशामध्ये झूम करा.
  • स्टेप 3: जर तुम्ही संगणक वापरत असाल तर राईट क्लिक करा आणि जर तुम्ही तुमच्या फोनवर अॅप वापरत असाल तर जास्त वेळ दाबा.
  • स्टेप 4: तुमच्या समोर एक डायलॉग बॉक्स दिसेल, त्यात ‘Report a Problem’ सर्च करा.
  • स्टेप 5: तुमच्या समोर एक नवीन पेज दिसेल, माय होम ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर Continue वर क्लिक करा.
  • स्टेप 6: दिलेल्या लाल बॉक्सने तुमचे होम आयकॉन झाकून टाका आणि ब्लर करण्याचे कारण एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा.

लायसेन्स प्लेट्स आणि वैयक्तिक डेटा कसा ब्लर करायचा

  • स्टेप 1: संवेदनशील माहिती असलेल्या स्ट्रीट व्ह्यु इमेजवर जा आणि तळाशी उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.
  • स्टेप 2: ‘Report a Problem’वर क्लिक करा, गोपनीयता धोरण निवडा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.
  • स्टेप 3: Google तुम्हाला एक स्ट्रीट व्ह्यु इमेज दाखवेल, तुम्हाला ब्लर करायच्या असलेल्या लायसेन्स प्लेटवर क्लिक करा आणि इमेज ब्लरवर क्लिक करा.
  • स्टेप 4: अतिरिक्त माहिती विभागात जा आणि ब्लर करण्याचे कारण लिहा.

या प्रक्रियेला थोडा वेळ लागत असला तरी, Google Map वरील ही माहिती ब्लर करणे खूप महत्त्वाचे आहे.