Dream Girl 2 : 4 फ्लॉप चित्रपटांनंतर आयुष्मान खुरानाने दिला हिट, ड्रीम गर्ल 2 ने 8 दिवसात कमावले 72 कोटी


आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपट थिएटरमध्ये चांगला व्यवसाय करत आहे. रिलीजच्या 8 व्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आयुष्मान खुराना पूजा बनून लोकांना आकर्षित करत आहे. सनी देओलच्या गदर 2 सारख्या ब्लॉकबस्टरच्या विरोधात उभे राहणे, हे आयुष्मानच्या ड्रीम गर्ल 2 चे मोठे यश आहे. गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने फ्लॉप चित्रपट देणाऱ्या आयुष्मान खुरानासाठी ‘ड्रीम गर्ल 2’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरत आहे.

ड्रीम गर्ल 2 ने पहिल्या दिवशी जवळपास 10 कोटींची कमाई केली होती. पहिल्या वीकेंडमध्येच चित्रपटाने त्याची किंमत वसूल केली होती. आता आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 ने रिलीजच्या 8 दिवसांत एकूण 72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वीकेंडला हा चित्रपट 100 कोटींच्या आसपास पोहोचू शकतो, असे मानले जात आहे.

आयुष्मान खुरानाने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक उत्तम चित्रपट केले आहेत. मात्र कमी बजेटमध्ये हिट चित्रपट देणारा आयुष्मान खुराना काही काळापासून फ्लॉप ठरत आहे. 2019 मध्ये आलेला आयुष्मानचा ‘बाला’ हा चित्रपट हिट ठरला होता. यानंतर आयुष्मान खुरानाने अॅन अॅक्शन हिरो, डॉक्टर जी, अनेक और चंदीगड करे आशिकी सारखे फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

आता बऱ्याच काळानंतर ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मानची जादू बॉक्स ऑफिसवर चालली आहे. ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान खुरानासोबत अन्नाया पांडे मुख्य अभिनेत्री आहे. संपूर्ण चित्रपट आयुष्मानभोवती फिरत असला तरी. ड्रीम गर्लनंतर आता आयुष्मान खुरानाने ड्रीम गर्ल 2 मध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 2019 मध्ये ‘ड्रीम गर्ल’नेही प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. ड्रीम गर्लने 142.26 कोटी कमावले होते.