आर माधवन याच्यावर मोठी जबाबदारी, FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती


साऊथ चित्रपटांचा मोठा स्टार आर माधवन चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. जेव्हा तो हिंदी चित्रपटात दिसतो, तेव्हा तो आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकतो. चित्रपटांमधील यशस्वी करिअरसोबतच आर माधवन सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही त्यांच्या रॉकेट्री द नंबी इफेक्ट या चित्रपटाला खूप मान मिळाला. आता आर माधवन याच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला FTII चे अध्यक्ष करण्यात आले आहे.

आर माधवनने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने कमाल केली आहे. बहुतेक साऊथ चित्रपट केलेल्या आर माधवनला तनु वेड्स मनु रिटर्न्स या हिंदी चित्रपटासाठी ओळखले जाते. या चित्रपटाचे दोन्ही भाग चाहत्यांना खूप आवडले. आता आर माधवन याच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याला FTII चे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने ही बातमी शेअर केली असून अनुराग ठाकूर यांनीही त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

याआधी दिग्गज चित्रपट निर्माते शेखर कपूर या पदावर होते, पण त्यांचा कार्यकाळ 3 मार्च 2023 रोजी संपला. आता आर माधवन या पदावर असणार आहे. या खास प्रसंगी माधवनने अनुराग ठाकूरसह सर्वांचे आभार मानले. अनुराग ठाकूर यांना उद्देशून आर माधवन याने लिहिले – या विशेष सन्मानासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.

आर माधवन गेल्या दोन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहेत आणि त्याचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. याशिवाय, तो आपल्या मुलामुळे देखील चर्चेत राहतो, जो खूप प्रतिभावान आहे आणि आपल्या वडिलांना जगभर प्रसिद्ध करत आहे. FTII बद्दल बोलायचे तर या संस्थेत अभिनयासह इतर अभ्यासक्रम चालवले जातात. अनेक बॉलिवूड कलाकारांनी येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यात ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील, डेव्हिड धवन, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्या नावांचा समावेश आहे.